AstikKumar Pandey esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : संसर्ग रोखण्यासाठी १५ कलमी कार्यक्रम

विलगीकरणातील रुग्णांवर ठेवणार महापालिका लक्ष

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट(third wave of corona) रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्जझाले असून, पंधरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण गृह विलगीकरणात (home quarantine) राहणार आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय(Commissioner astikkumar pandey)) यांनी सोमवारी (ता. १०) सांगितले.

कोरोना(corona) उपाययोजनांबाबत श्री. पांडेय म्हणाले, की ज्या हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना तो डोस प्राधान्याने देणे व ज्यांनी दोन्हीही डोस घेतले आहेत त्यांना तिसरा डोस देणे, याला प्राधान्य आहे. आभासी पद्धतीने कोरोनाबाधितांना वैद्यकीय सल्ला दिला जाईल. त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. त्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन कमांड सेंटर दोन-तीन दिवसात सुरू होईल. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाईल. दवाखाने, कोविड केअर सेंटर्समधील ऑक्सिजनची यंत्रणा सज्ज ठेवली जाईल. महापालिकेकडे अकरा रुग्णवाहिका आहेत, त्या सज्ज ठेवल्या जातील. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर या ठिकाणी आवश्यक ती साधनसामुग्री अद्ययावत स्वरूपात

तयार करून ठेवणे, पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेसोबत काम केले आहे, त्यांनाच पुन्हा संपर्क साधून गरजेनुसार त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी पाच दिवसातून एकदा जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतील, रुग्णवाहिकांच्या सेवेसाठी समन्वयक नेमला जाईल. जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करून घेण्याकडे लक्ष दिले जाईल. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ओमीक्रॉनचा संसर्ग होऊ न देणे हे सर्वात मोठे आव्हान असेल, असेही आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

पुन्हा होणार स्मार्ट बसचा वापर

पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्ण, कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी शहर बसचा वापर करण्यात आला होता. यावेळी देखील गरज पडल्यास या बसचा उपयोग केला जाईल. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कंट्रोलरुम मधून मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे. खासगी दवाखान्यांनी देखील त्यांच्याशी संपर्कात असलेल्या रुग्णांना आभासी पद्धतीने मार्गदर्शन करावे, वैद्यकीय सल्ला द्यावा. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, असे आवाहन श्री. पांडेय यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT