औरंगाबाद : लॉन्समधून नववधूचे ३६ लाखांचे दागिने पळविले!
औरंगाबाद : लॉन्समधून नववधूचे ३६ लाखांचे दागिने पळविले! esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : लॉन्समधून नववधूचे ३६ लाखांचे दागिने पळविले!

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : महागडे कपडे परिधान करून वधू किंवा वराकडील जवळचा नातेवाईक असल्यासारखे भासवत लग्नसमारंभात प्रवेश करायचा, वधूवरांच्या माता-पित्यांवर करडी नजर ठेवायची, हातातल्या बॅग, पर्समधील मौल्यवान वस्तूची रेकी करत हळूच संधी साधत पोबारा करायचा... या पद्धतीने सूर्या लॉन्सच्या हॉलमध्ये लग्नापूर्वीच्या संगीत रजनी कार्यक्रमातून दोघा-तिघांनी तब्बल ३६ लाख ५० हजार रुपयांचे दागिने, हिरे, रत्न असलेली बॅग डोळ्याची पापणी लवते न लवते तोच लंपास केल्याचा प्रकार सोमवारी (ता.६) रात्री आठे ते नऊच्या सुमारास घडला. मात्र, हा प्रकार ११ वाजता समोर आल्यानंतर वऱ्हाडींसह पोलिसांचीही रात्रभर धावपळ उडाली.

याप्रकरणी सुनील जैस्वाल (रा. नागपूर) यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जैस्वाल यांच्या मुलाचा लग्नसोहळा बीड बायपास रस्त्‍यावरील सूर्या लॉन्समध्ये आयोजित केला होता. वऱ्हाडी मंडळींसाठी सायंकाळी पाचपासून लॉन्सच्या हॉलमध्ये संगीत रजनी कार्यक्रम होता. जैस्वाल परिवाराने नववधूसाठी (सून) तब्बल ३६ लाख ५० हजार रुपयांचे रत्नजडित, हिरेजडित आणि सोन्याचे दागिने आणले होते. दरम्यान स्टेजवर साहित्य उचलणे, ठेवणे अशी कामे करणारा एक संशयित होता. मात्र, भरजरी वस्त्रे घालून मिरविणारा हा जवळच्या नातेवाइकांपैकी असावा असा समज सर्वांचा होता. त्यावेळेस वरपिता सुनील जैस्वाल यांच्याकडेच ही बॅग होती. परंतु त्यांना स्टेजवर बोलाविण्यात आले असता, ते बॅग बाजूला ठेवत स्टेजवर गेले, तितक्यात आधीच पाळत ठेवलेल्या संशयिताने संधी मिळताच बॅग घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे, दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याचे रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास समोर आले त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. विशेष म्हणजे अशीच घटना शहरातील एका हॉटेलमधील लग्नसमारंभात पंधरवड्यात घडली होती. त्या घटनेत ६ लाखांचे सोने लंपास झाले होते.

संशयित सीसीटीव्हीत कैद

प्रत्यक्ष बॅग चोरणारा, त्याला बॅकअप देणारा आणि ज्या कारमधून ते पसार झाले ती कार हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सोहळ्यात घुसलेल्या दोन्ही चोरट्यांनी जवळपास तासभर रेकी केली. अधूनमधून खुर्ची उचलणे, कोणाला बसायला जागा देणे, इकडचे साहित्य तिकडे नेऊन ठेवणे, अशी कामे करतानाही ते दिसून आले. बॅग चोरल्यानंतर त्याला बॅकअप देणाऱ्या चोरट्याने हा प्रकार हेरला आणि तोही त्याच्यासोबतच बाहेर पडला. दोघेही पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये जाऊन बसले. काही क्षणात कार देवळाई चौकाच्या दिशेने पसार झाली. यावरुन कारमध्ये आणखी एक साथीदार असावा, असा अंदाज निरीक्षक गात यांनी व्यक्त केला. पुढील तपास उपनिरीक्षक ए. के. रगडे करत आहेत.

लॉन्स सातारा हद्दीत तर हॉल चिकलठाणा हद्दीत

दागिने चोरीची घटना समोर येताच जैस्वाल यांनी तातडीने अगोदर शहर पोलिसांशी संपर्क केला, दरम्यान गुन्हे शाखेचे पथक तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु, घटना घडल्याचे ठिकाण चिकलठाणा ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ही माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली. सूर्या लॉन्सची इमारत (हॉल) चिकलठाण्याच्या हद्दीत आणि ओपन लॉन्स हा सातारा ठाण्याच्या हद्दीत असल्याचे चिकलठाणा पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी सांगितले. विशेष म्हणजे अशा घटना टाळण्यासाठी चोरट्यांची छायाचित्रे लॉन्सच्या गेटवर लावली होती, मात्र त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही, अशीही माहिती लॉन्सजवळ राहणाऱ्या नागरिकाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT