About 40 percent hike in Rakhi rates
About 40 percent hike in Rakhi rates esakal
छत्रपती संभाजीनगर

राख्यांच्या दरात सुमारे ४० टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण गुरुवारी (ता. ११) साजरा होणार असून बाजारातील आकर्षक राख्या बहिणींना भुरळ घालत आहेत. महागाईमुळे राख्यांच्या दरात सुमारे ४० टक्के दरवाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपरिक गोंडा राखी विक्रीस दाखल झाली आहे. कुंदन वर्क आणि रेशमी धाग्यातील साध्या राख्यांना विशेष पसंती आहे. भावाच्या नावाच्या राख्या, चांदी आणि सोन्यामधील राख्यांनाही मागणी वाढत आहे. शहराच्या गुलमंडी, राजाबाजार, औरंगपुरा, गजानन मंदिर, शिवाजी नगर, पुंडलिक नगर, टिव्ही सेंटर, सिडको अशा विविध भागांमध्ये लहान-मोठ्या राखी विक्रीची दुकाने सजल्याचे दिसत आहेत.

कामानिमित्त परदेश तसेच शहराबाहेर असलेल्या भाऊरायांना साध्या राख्यांना विशेष पसंती असून भावाच्या नावाच्या राख्या, चांदी आणि सोन्यामधील राख्यांनाही मागणी आहे, सणाकरिता बाजारात चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्रीगणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपरिक गोंडा राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत.

फेसबुक, ट्विटर राख्यांनी वेधले लक्ष

नव्या प्रकारात डोरेमॉन, छोटा भीम, कृष्णा तर लायटिंग राखीमध्ये स्पिनर लायटिंग राखी, कपल राखी विशेष लोकप्रिय ठरत आहे. लायटिंग राखीमध्ये बटन दाबले की, विविध रंगीत लायटिंगमुळे आकर्षकता वाढते. तर पहिल्यांदाच बाजारात व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर राख्यांनी लक्ष वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT