ABVP Agitation In Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

विद्यापीठात परीक्षा निकालासाठी विद्यार्थी परिषदेचे ठिय्या आंदोलन, प्र-कुलगुरुंना दिले निवेदन

ई सकाळ टीम

औरंगाबाद : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात परीक्षा निकालासाठी आज गुरुवारी (ता.१७) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने (अभाविप) ठिय्या आंदोलन करण्यात आले. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा निकालात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी निकाला संदर्भात अभाविपच्या वतीने अनेक वेळेस निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आज अभाविपच्या वतीने  प्रदेश सहमंत्री अंकिता पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी प्र-कुलगुरु श्‍याम शिरसाठ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की चुकीचे लागलेले निकाल तात्काळ दुरुस्त करण्यात यावे. सरासरीनुसार उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल नापास दाखवत आहेत,त्यात तत्काळ दुरुस्ती करावी. अद्यापही न लागलेल्या विषयांचे निकाल त्वरित घोषित करावे. डिप्लोमा करून थेट द्वितीय वर्षाला प्रवेशित अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे मागील तीन वर्षाचे रखडलेले पदवी प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे. विद्यार्थ्यांना निकालात असणाऱ्या त्रुटी ऑनलाइन पद्धतीने मांडण्यासाठी पर्याय निर्माण करावा व विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालय नियमित सुरू करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्या येत्या दोन दिवसांत पूर्ण होतील, असे प्र-कुलगुरुंनी लेखी आश्‍वासन दिले. या प्रसंगी प्रदेश सहमंत्री अंकिता पवार म्हणाल्या की, मराठवाड्यातील गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्य सोबत विद्यापीठ प्रशासन खेळ करत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येत्या दोन दिवसांत विद्यापीठावर धडक मोर्चा काढून विद्यापीठ प्रशासनाला जागे करण्याचे काम करेल. यावेळी महानगर मंत्री निकेतन कोठारी, सहमंत्री उमाकांत पांचाळ, ऋषिकेश केकान, स्नेहा पारिक, जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगीर, नागेश गलांडे, जिल्हा सहसंयोजक अंबादास मेव्हनकर, शुभम फाळके, सुभाष बोडखे, धनंजय शेरकर, अंगद खरात, विशाल गिरी, अनिकेत डोहाळे, निखिल सोनी, उमेश भताने, दीपक टोणपे, तुषार साळुंके यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT