Crime 
छत्रपती संभाजीनगर

या पठ्ठ्याने व्याजाने कार घेतली अन् बनावट कागदपत्राद्वारे विकली आता...

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: व्याजावर घेतलेल्या कारचे हप्ते न फेडता बनावट कागदपत्रांधारे कारची विक्री करुन बॅंकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी शुक्रवारी (ता.१९) दिले. संजय भिकाजी साळवे (रा. बाजीराव पेशवे नगर, सातारा परिसर) असे त्या आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बॅंक लि. ची सातारा येथील शाखेचे कर्ज विभाग प्रमुख सुधाकर जिजाराव शिंदे (५२, रा. राजेश नगर, बीड बायपास) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, बॅंकेने आरोपीला कार घेण्यासाठी २५ एप्रिल २०१५ रोजी ११ लाख ८९ हजार ३० रुपयांचे कर्ज शेकडा १५ टक्के व्याज दराने ६० महिन्यांसाठी दरमहा २७ हजार ९७ रुपये मासिक हप्त्याने प्रमाणे परत फेडीच्या अटीवर दिले होते.

आरोपीने २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत एक लाख रुपयांचा कर्ज भरणा केली. त्यानंतर आरोपीने कर्ज न भरल्याने बॅंकेने त्याला लेखी व तोंडी सुचना देखील केल्या, मात्र आरोपीने कर्जाची परतफेड केली नाही. दरम्यान आरोपीने कर्जावर घेतलेली कार (क्रं. एमएच२० डीजे ५८४७) बॅंकेच्या संमतीशिवाय बनावट कागदपत्र तयार करुन बॅंकेचे कर्ज नोंदीचे तारण बोजा नोंद काढून टाकण्यासाठी ते आरटीओ कार्यालयात दाखल केले.

आरटीओ कार्यालयाने पडताळणीसाठी बॅंकेला पत्र पाठविले तेंव्हा ही बाब समोर आली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी संजय साळवे याला १७ जून रोजी अटक केली. तर न्यायालयाने त्याला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी दरम्यान आरोपीने पैशांची अडचण असल्याने सदरील कार नामदेव गायकवाड याच्या मध्यस्थीने मुकेश वासनीक (रा. मालीपार, जि. भंडारा) दोन लाख २० हजारांना विकल्याचे सांगितले.

कोठडीची मुदतसंपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीने विक्री केलेल्या कारचा शोध घेणे आहे. गुन्ह्यात वापरलेले बॅंकेचे कागदपत्र व खोटे स्टॅम्प कोठे तयार केले याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याबाबत देखील तपास करणे असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी न्यायालयाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

IND A vs AUS A: एका कॅचसाठी भारताच्या दोन खेळाडूंची टक्कर... पुढे जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसला नाही, Video Viral

'आता दे ग दे जुजबी गालावर' सोनाली बेंद्रे आणि सई ताम्हणकरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाली... Video Viral

Marathi News Live Updates: कास पठाराला दुष्काळाच्या झळा; कमी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे फुलांचा बहर ओसरला, पर्यटकांमध्ये नाराजी

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

SCROLL FOR NEXT