4rape_20_0.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अल्पवयीन मुलीला पळवून नेले, गर्भवती केल्यानंतर न्यायालयात म्हणाला...

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी लग्न करुन तिला गर्भवती करण्यास कारणीभूत ठरलेला आरोपी अविनाश भगवान साळवे (२०, रा. म्हाडा कॉलनी, चेतनानगर, हर्सुल) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी बुधवारी (ता.२२) दिले.

प्रकरणात पिडितेच्या आईने तक्रारी दिली होती. तक्रारीनुसार, पिडिता ही आई, वडील, दोन भाऊ व बहिणी सोबत राहते. पिडितेची आई एका शाळेवर काम कामगार म्हणून करते. २७ फेब्रुवारी रोजी पिडितेची आई नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. सायंकाळी पिडितेची आई घरी आली असता पिडिता ही दुपारपासून घरी नसल्याची बाब पिडितेच्या बहिणीने आईला सांगितली. प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी तपास केला असता आरोपी साळवे याने पिडितेला पळविले असल्याची बाब समोर आली. तसेच आरोपी हा पिडितेसोबत हिनानगर भागात किरायाने खोली घेऊन राहत असल्याची देखील स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीला १८ जुलै रोजी अटक केली.

तर पिडितेला ताब्यात घेत तिचा जबाब नोंदविला. त्यात आरोपीने पिडितेशी हिनानगर येथे असतांना लग्न केले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पिडितेचे पोट दुखत असल्याने पिडिता डॉक्टरकडे गेली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले.
हेही वाचा- Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम

न्यायालयात हजर केले असता....

दरम्यान आरोपीला न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. प्रकरणात सहाय्यक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT