12 th Board  sakal
छत्रपती संभाजीनगर

12 th Board : कॉपी केली तर कारवाई होणारच! ; अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांची नजर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी विभागीय मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी आदर्श कार्यपद्धतीचा अवलंब केला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी विभागीय मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी आदर्श कार्यपद्धतीचा अवलंब केला. त्यासाठी भरारी पथके लक्ष ठेवून असणार आहेत.

त्यामुळे यंदा अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला आळा बसणार आहे. या संदर्भात शुक्रवारी (ता. १६) देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात बैठक झाली. बैठकीला शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले, शिक्षण मंडळाचे सहायक सचिव ज्ञानेश पानसरे, शिक्षण विस्ताराधिकारी जे. व्ही. चौरे आदींची उपस्थिती होती.

यंदा बारावीच्या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील १,४०८ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १ लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. परीक्षेसाठी ४४९ परीक्षा केंद्र असून, ५८ परिरक्षक केंद्र असतील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकार होणार नाही, याबाबत विद्यार्थी पालक, शिक्षक, संस्थाचालकांचे उद्बोधन करण्यात आले.

शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्वसाधारण, संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रे निश्चित करून संबंधित यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक भरारी पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्या तालुक्यात परीक्षा केंद्र जास्त असतील तेथे एकापेक्षा जास्त भरारी पथक तैनात असतील. या भरारी पथकांत किमान एक महिला अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे. हे पथक दरदिवशी वेगवेगळ्या तालुक्यांना भेटी देणार आहे. तर जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची (जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, प्रांत) परीक्षा केंद्रांना तसेच परिरक्षण केंद्रांना पूर्वसूचना न देत अचानकपणे भेट देणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

असेल अखंडित वीजपुरवठा

मराठवाड्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरवात होते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर लाइट, फॅन, सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत सुरू राहण्यासाठी परीक्षा कालावधित अखंडित विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरणला बोर्डाकडून कळविण्यात आले आहे.

१४४ कलम लागू

परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पोलिस अधिनियम ३७ (१), (३) चा वापर करण्याबाबत पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळविण्यात आले. परीक्षा केंद्रावर बाह्य उपद्रव कमी होत नसेल तर अशा केंद्रावर १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर सर्वसाधारण केंद्रापेक्षा अधिकचा पोलिस बंदोबस्त असणार आहे; तसेच सर्व परीक्षा केंद्रावर हत्त्यारी पोलिस बंदोबस्त असेल.

जिल्हानिहाय विद्यार्थी, परीक्षा केंद्रे

जिल्हा परीक्षा केंद्र विद्यार्थी संख्या

छत्रपती संभाजीनगर १६४ ६३२१७

बीड : १०२ ४१०५२

परभणी : ६७ २६६९५

जालना : ७९ ३३६४६

हिंगोली : ३७ १४४०४

एकूण : ४४९ १७९०१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT