Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

बोंबाबोंब झाल्यानंतर आली प्रशासनाला जाग 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी कुणालाही न जुमानता आपली दुकानदारी सुरूच ठेवलेली आहे. याची सतत ओरड होत असतानाही मूग गिळून गप्प बसलेल्या प्रशासनाला आता जाग आली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर एका शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश काढून त्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यातील ८०२ स्वस्त धान्य दुकानांपैकी १९९ महापालिकेच्या हद्दीत आहेत. यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी कृषी सहायक आणि मंडळाधिकारी यांचा यात समावेश करून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोचवावे आणि कोणीही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. गावामध्ये धान्य प्राप्त झाल्यानंतर गावात दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांच्या आणि लाभार्थ्यांच्या निदर्शनास आणावे, लाभार्थ्यांच्या याद्या या स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात.

गावात धान्य प्राप्त झाल्यानंतर याची माहिती सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांना देण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने यापूर्वी नियमित कार्यरत असणाऱ्या तीन योजना अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना आणि एपीएल शेतकरी योजना या व्यतिरिक्त इतर दोन योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये मोफत तांदूळ देण्यात येत आहेत.

मोफत तांदूळ हे फक्त अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना देतात. एपीएल शेतकरी यांना मोफत तांदूळ देण्यात येत नाहीत. तसेच जे केशरी कार्डधारक आहेत ज्यांचा समावेश प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी याच्यामध्ये नाही आणि ज्यांना नेहमी धान्य प्राप्त होत नाही अशा लाभार्थ्यांना सुद्धा मे महिन्यामध्ये धान्य मिळणार आहे. 

सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचे सर्व योजनांचे धान्य अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना येथील शेतकरी योजना आणि मोफत तांदूळ सर्व दुकानांमध्ये पोचलेला असून, ९० टक्के लाभार्थ्यांपर्यंत त्याचे वाटप झाले आहे. आजही स्वस्त धान्य दुकानांतून उर्वरित लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येत आहे. कार्डधारकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाभर विविध पथके स्थापन करण्यात आलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनी निकाल

Amit Shah Kolhapur Speech : अमित शहांकडून कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट ‘शिवसेना प्रमुख’ म्हणून उल्लेख

पवनराजे निंबाळकर हत्याकांड! तपासातील त्रुटींवर कोर्टाचा कठोर आक्षेप; निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे पॉइंट टू पॉइंट

महाराष्ट्र जळतोय, राजकारणी फक्त फोडाफोडीत व्यस्त; ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, अमित शाहांच्या PM मिशनवर मोठा दावा

IND vs AFG 3rd ODI: हर्षित राणा बाकावर, KL Rahul ला विश्रांती अन्... भारतीय संघात ३ बदल; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT