Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

गावाकडे जायचंय, मग हे करा...

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : आपल्या गावाकडे जाण्यासाठी, तसेच परजिल्ह्यातून औरंगाबादला येण्यासाठी परवानगी हवी असल्यास सबंधीत अधिकाऱ्यांकडे आॅनलाईन माहिती भरुन द्यावी लागणार आहे. 

कोरोनाच्या संकटाने सर्वानाच चांगलेच घेरले आहे. अचानक लाॅकडाऊनची घोषणा झाल्यामुळे अनेक मजूर देशाच्या व राज्याच्या विविध भागात अडकुन पडले आहेत. आम्हाला गावाकडे जावुद्या, यासाठी मागील काही दिवसांपासुन ते सरकारकडे मागणी करीत आहेत. त्यांची अडचण लक्षात घेऊन सरकारने अडकलेल्यांना त्यांच्या गावी नेऊन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मात्र, शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

इतर राज्यातील नागरिकांना औरंगाबाद जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा परराज्यात जाण्यासाठी तसेच इतर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून औरंगाबाद जिल्ह्यात येण्यासाठी http://covid19.mhpolice.in/या लिंकचा वापर करावा. यात आपली संपूर्ण माहिती भरून सबमिट करावे. आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून ऑनलाइन पास देण्याची कारवाई करण्यात येईल.

तसेच जे महाराष्ट्रातील नागरिक औरंगाबादेत अडकले आहेत. त्यांना आपल्या गावाकडे जायचे आहे. अशांनी औरंगाबाद पोलिस आयुक्तालयात पोलीस आयुक्त औरंगाबाद यांच्या नावाने आपला अर्ज लेखी किंवा pisb.abadcity.corona@gmail.com या ई-मेलवर आॅनलाईन पद्धतीने अर्ज करून कागदपत्रे सादर करावेत. शहरासाठी ही कार्यवाही पोलीस आयुक्तालय मार्फत केली जाईल तर ग्रामीण भागासाठी ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाईल. याव्यतिरिक्त कोठेही पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 

प्रथम आपला फॉर्म नीट भरला असल्याबाबत खात्री करावी. तरीदेखील याबाबत अडचण आल्यास जिल्हा नियंत्रण कक्षातील या 0240-2331077 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय कोणतेही राज्य किंवा विभागीय किंवा जिल्हा नोडल अधिकारी यांना फोन करण्याची किंवा मेसेज करण्याची आवश्यकता नाही, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT