corona.jpg
corona.jpg 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना ड्रॅगनचा औरंगाबादसह ग्रामीण भागालाही विळखा, शहरात ११२, ग्रामीण भागात ५१ कोरोना रूग्ण

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. आज (ता.२३) सकाळी १६३  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे. आज वाढलेल्या १६३ रुग्णांपैकी ११२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ५१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २०४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २०३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १५७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये ५५ महिला आणि १०८ पुरुषांचा समावेश आहे.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना  
 आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे : (कंसात रुग्ण संख्या) : 

शिवाजी नगर (४), सिडको एन चार, जय भवानी नगर (१), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (४), बायजीपुरा (१), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (१), सिडको (१), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (१), उत्तम नगर (१), समर्थ नगर (१), म्हाडा कॉलनी (१), अरिफ कॉलनी (१), कोटला कॉलनी (१), उस्मानपुरा (१), एन नऊ सिडको (३), अंबिका नगर (१), पडेगाव (१), भानुदास नगर (७), न्यू नंदनवन कॉलनी (१), विष्णू नगर (१), उल्का नगरी (१), पद्मपुरा (५), क्रांती नगर (१), नागेश्वरवाडी (२), नक्षत्रवाडी (१), एन पाच सिडको (२), एन सहा, मथुरा नगर (३), गजानन नगर (६), औरंगपुरा (१), जय भवानी नगर (८), एन सहा, संभाजी कॉलनी (१), नानक नगर (१), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (१), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (१), एन सहा सिडको (२), सेवा नगर हाऊसिंग सोसायटी (१), राज हाइट, सेव्हन हिल जवळ (१), जे सेक्टर, मुकुंदवाडी (१), भगतसिंग नगर (३), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (१), कॅनॉट प्लेस (१), न्यू विशाल नगर (१), श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी (१), राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी (१), मुकुंदवाडी (२), मयूर नगर (१), आयोध्या नगर (२), बौद्धवाडा चिकलठाणा (१),  चिकलठाणा हनुमान चौक (२), सुरेवाडी (१), विजय नगर (२), गारखेडा परिसर (१), रशीदपुरा (१), सिडको महानगर दोन, वाळूज (४), जय गजानन नगर (१), अन्य (१), कैलास नगर (१), एन दोन सिडको (३), जोहरीवाडा, गुलमंडी (१), राजेसंभाजी नगर (१), बन्सीलाल नगर (१), रमा नगर (१), हनुमान नगर (२), सातारा परिसर (१), मयूर पार्क (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण 
मांडकी (२), सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर (२), राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (५), ओयासिस चौक, पंढरपूर (१), ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर (१), हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), सारा गौरव, बजाज नगर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (१), एन अकरा, मयूर नगर, हडको (२), पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (१), संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर (१), वडगाव (१), विराज हाईट, बजाज नगर (१), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), करमाड (६), फत्तेह मैदान, फुलंब्री (१), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (१), कोलघर (२), गजगाव, गंगापूर (१), लासूर नाका,गंगापूर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), शिवूर बंगला (२), कविटखेडा, वैजापूर (१), शिवूर (५), मधला पाडा, शिवूर, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये ५५ स्त्री व १०८ पुरुष आहेत.

खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
औरंगाबादेतील गोरखेडागाव येथील ६६ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा २३ जून रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील  विविध खासगी रुग्णालयांत जिल्ह्यातील एकूण ५४, घाटीमध्ये १४८ आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात एक अशा एकूण २०३ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना मीटर 
सुटी झालेले रुग्ण   -२०४६
उपचार घेणारे रुग्ण - १५७०
एकूण मृत्यू            -  २०३
आतापर्यंत एकूण बाधित - ३८१९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT