Aurangjeb Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद; पुरातत्त्व खात्याचा निर्णय

औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद करण्यात आलेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.

(Aurangzeb Qabar Close For Tourist)

यासाठी औरंगजेब कबर कमिटीने यासाठी पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून राज्यातील सद्यस्थिती पाहता औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे असा सवाल मनसेने केल्यावर कबर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

सध्या औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदुकधारी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. कबरीचा परिसर पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली येतो, कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला हवीय? असा सवाल मनसेने केल्यावर तेथे पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला होता. त्यानंतर राज्यभर या प्रकरणावरून वादाला तोंड फुटले होते. मशिदी आणि मंदिराचाही वाद देशात वाढला असून त्याच पार्श्वभूमीवर औरंगजेब कबर कमिटीने पर्यटकांसाठी कबर पाच दिवस बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्यावर पुरातत्त्व विभागाने हा निर्णय घेतला असून पोलिसांचा बंदोबस्त खुल्ताबादेत वाढवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT