Kondirak Mitkar Over Come Corona At 92 Age  
छत्रपती संभाजीनगर

जिद्दीला सलाम! आजोबांनी ९२ व्या वर्षी कोरोनावर केली मात

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : जगण्याची तीव्र इच्छा, डॉक्टरांचे परिश्रम आणि कुटुंबाने दिलेल्या हिमतीच्या बळावर नव्वदी पार केलेल्या ९२ वर्षीय आजोबाने कोरोनाला हद्दपार केले. कोंडिराम दशरथ मिटकर (रा. यशवंतनगर, पैठण) असे या आजोबांचे नाव आहे. मिटकर हे कुटुंब पैठण येथील रहिवासी असुन या कुटुंबातील २६ सदस्य आहेत. या सर्वांना सर्दी, खोकला व ताप आल्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले असता केलेले कोरोना चाचणीत कुटुंबातील १३ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यात आजोबा ही पॉझिटिव्ह हे आले.

घरातील धडधाकट मंडळींनी कोरोनाचा त्रास सहन करुन उपचार सुरु केले. परंतु त्यांना मोठी काळजी लागली ती त्यांच्या ९३ वर्षाच्या आजोबांची. आता आजोबांचे कसे होईल. उपचाराने ते लवकर बरे होतील का? असे नानाविध प्रश्न घरातील मुलगा, सुना व नातवंडाना भेडसावु लागले. त्यामुळे घरातील सगळेच जण अक्षरशः घाबरुन गेले होते. यानंतर नातेवाईकांनी पैठण येथील डॉ. संदीप शिरवत यांच्या मार्गदर्शनाखाली आजोबांना विलास बापू प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी तालुका शेवगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

आजोबांनी तेथे सात दिवस राहुन उपचार घेतले व त्यात ते बरे ही झाले. डॉ. कृष्णा देहाडराय डॉ. विकास बेडके यांनी उपचार केले. विशेष बाब म्हणजे घरातील १२ सदस्य अजून ही उपचार घेत असून त्यांच्या अगोदर नव्वदी पार केलेल्या आजोबांनी कोरोनाला हद्दपार केले. त्यामुळे वयोवृद्ध आजोबाच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा होत असुन कौतुक होत आहे. 
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT