File Photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादचा धोका वाढताच..दिवसभरात चार रुग्ण पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या 44 वर 

मनोज साखरे

औरंगाबाद - औरंगाबादेत आणखी चार जणांना कोविड -१९ विषाणुचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी (ता. २४) स्पष्ट झाले आहे.

दुपारी भीमनगर भावसिंगपुरा येथील २७ वर्षीय तरुण आणि आसेफिया कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुषाचे तर सायंकाळी समतानगर येथील २४ वर्षीय तरुण आणि ३७ वर्षीय महिलेचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. 

समतानगर हा भाग हॉटस्पॉट ठरला असुन येथील रुग्णसंख्या आठवर पोचली आहे. भीमनगर भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.  या महिलेच्या मृत्यूनंतर लाळेच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

त्या महिलेच्या अंत्यविधीला अनेक लोक सहभागी होती. सहभागी एका व्यक्तीचा गुरुवारी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर आज याच भागातील २७ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे भिमनगर भावसिंगपुरा येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन झाली आहे. समतानगर येथे सर्वप्रथम ३८ वर्षीय कारागिराला कोरोनाची लागण झालीय त्यानंतर शुक्रवारी येथील समतानगर येथील २४ वर्षीय तरुण आणि ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

आसेफिया कॉलनीत नातेवाईकांतुन ३८ वर्षीय पुरुषाला संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहराचा धोका वाढत आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबाद कोरोना मिटर 

  • उपचार घेत असलेले -१७ रुग्ण 
  • कोरोनामुळे मृत्यू - ०५
  • बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -२२
  • एकूण रुग्णसंख्या -44
  •  

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT