छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शहरात डिसेंबरपासून पीएनजी गॅसची मिळणार सुविधा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) औरंगाबाद व नगर जिल्ह्यामध्ये सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) नेटवर्क उभारले आहे. यात साडेतीनशे किलोमीटर गॅसच्या पाइपलाइनचे काम प्रगतिपथावर आहे. यातील जवळपास १७० किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण करून डिसेंबर महिन्यात शहरातील नागरिकांना घरगुती पीएनजी गॅसची सुविधा देण्याचा मानस बीपीसीएलचे कार्यकारी संचालक (गॅस) सुखमल जैन यांनी व्यक्त केला.

मंगळवारी (ता.१) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते.

पुढे सुखमल जैन म्हणाले, की २०१८ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती, त्यानुसार भारत पेट्रोलियमतर्फे या योजनेची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून पुढील पाच वर्षांत १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यात शहरात जवळपास २७,१७८ चौरस किलोमीटर परिसरात पहिल्या पाच वर्षांत सुमारे तीन लाख पीएनजी जोडणी, १०० सीएनजी भरणा स्थानके आणि ३५० किलोमीटर लांबीचे स्टील पाइपलाइन नेटवर्क उभारण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जैन म्हणाले. यावेळी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन विभागाचे

राज्य समन्वयक संतोष निवेंद्रकर, प्रादेशिक एलपीजी व्यवस्थापक टी. व्ही. पांडियान, मुख्य महाव्यवस्थापक अख्तर सय्यद अब्बास, कार्यकारी संचालक पी.एस. रवी, पी. एस. सुधाकर, श्रीपाद मांडके उपस्थित होते.

औद्योगिक कंपन्यांना होणार पुरवठा : डॉ. कराड

औरंगाबाद शहर प्रदूषणमुक्त व तसेच नागरिकांना घरगुती व उद्योगांना गॅस भरण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पीएनजीच्या जोडणीचे काम होत आहे. याअंतर्गत वाळूज एमआयडीसी परिसर, बिडकीन डीएमआयसी तसेच लाडगाव, करमाड व गंगापूर, बजाजनगर अशा औद्योगिक परिसरात परिसरातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकनंतर आता औरंगाबाद शहरामध्ये सीएनजी आणि पीएनजी गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT