Aurangabad recovery rate increased Aurangabad recovery rate increased
छत्रपती संभाजीनगर

चांगली बातमी! औरंगाबादची रुग्णसंख्या महिनाभरात निम्म्याने घटली

शहरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचे हाल सुरूच असून, दुसरीकडे शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा झपाट्याने खाली येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात २६ मार्चला १० हजार ८९० सक्रिय रुग्ण होते. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार ९४८ एवढी आहे.

शहरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे एकट्या मार्च महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३२ हजार कोरोनाबाधित निघाले. या रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे प्रशासनाने कमी त्रास असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला.

दरम्यान, केंद्रीय पथकाने शहरात दोनवेळा येऊन परिस्थितीचा आढावा घेतला व चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवले. दुसरीकडे लसीकरणाला गती दिली. सहा एन्ट्री पॉइंटवर ॲन्टीजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या. परिणामी शहरात येणारे बाधित शहराबाहेरच थांबले ल संसर्गाला ब्रेक लागला.

त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. गेल्या महिन्यात २६ मार्चला शहरात १० हजार ८९० सक्रिय रुग्ण होते. २६ एप्रिलला सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ९४८ एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Health System: अहिल्यानगर ते मुंबई! नवजात बाळाची तीन जिल्ह्यात फरफट, खासदारांच्या कॉलनंतरही उपचार होईनात; आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार..

कोल्हापूर हळहळलं! एका क्षणात संसार उद्ध्वस्त; डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकी विहिरीत, पतीसमोरच पत्नीचा दुर्दैवी अंत

CSK vs SRH: पराभवानंतरही ऋतुराज गायकवाड म्हणतोय, 'तरी मला माझ्या खेळाडूंचा अभिमानच'; पुढच्या वर्षीचा प्लॅनही सांगितला

NEET Exam: नीट पेपर लीक प्रकरणात नवा खुलासा; २७ एप्रिललाच शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका... उत्तर प्रदेश - हरियाणा कनेक्शनही समोर

Latur News: लातुरच्या शिक्षण बाजारात ५०० कोटींची उलाढाल, प्रामाणिक पॅटर्नला क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेनं गालबोट, 'मॅनेज'साठी नवा फंडा

SCROLL FOR NEXT