corona image.jpg
corona image.jpg 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus : औरंगाबादेत १४ दिवसानंतर बाधीत संख्या कमी, आज ५० रुग्णांची वाढ 

मनोज साखरे

औरंगाबाद :  औरंगाबादेत गत १४ दिवसानंतर आज (ता. १५) दिलासा मिळाला. रोज शंभर व त्यापेक्षा अधिक रुग्ण बाधित आढळत होते, आज ५० रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८०६ झाली आहे. जिल्ह्यातील १ हजार ५०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत १५० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आता १ हजार १५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती  प्रशासनाने दिली. 

या भागात आहे रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -
नारेगांव (१), पवन नगर, टिव्ही सेंटर (२), एस.टी. कॉलनी, एन-२ (१), गल्ली नं ४, गजानन नगर (४), सुतगिरणी, गारखेडा परिसर (१), नवजीवन कॉलनी, एन-११ (१), एन-८, सिडको (३), मोतीवाला नगर (१), एन-९ सिडको (१), कोतवालपुरा (१), आझाद चौक (१), मंजुरपुरा (१), आसेफिया कॉलनी (१), नुतन कॉलनी (१), एन-६ सिडको (२), सिटी चौक (१), गुलमंडी (१), कैलास नगर (१), मिल कॉर्नर (१), बजाजनगर (२), अंबिका नगर (५), आंबेडकर नगर (६), हर्सुल परिसर (२), बारी कॉलनी (१), सिव्हील हॉस्पीटल परिसर (१), जयसिंगपुरा (१), छावणी (१), दुधड (४),‍  अन्य (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १८ स्त्री व ३२ पुरूष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये  पुरूष आणि महिलांचा समावेश आहे.


घाटीत दोन, खासगीत पाच कोरोनाबाधिताचा मृत्यू 
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी)  शहरातील मयूर नगरातील ७१ वर्षीय पुरूष रुग्णाचा १३ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता व रेहमानिया कॉलनीतील ५० वर्षीय पुरूष रुग्णाचा संध्याकाळी सात वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात १३ जून रोजी रोशन गेट, बारी कॉलनी येथील ६२ वर्षीय स्त्री रुग्णाचा रात्री पाऊणे अकरा वाजता व जहांगीर कॉलनीतील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा १४ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता मृत्यू झाला. बारी कॉलनीतील ५२ वर्षीय पुरूष रुग्णाचा सकाळी अकरा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एका खासगी रुग्णालयात सिडकोतील एन सहामधील साई नगरातील ५८ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील अन्य एका रुग्णालयात रेल्वे स्टेशन परिसरातील सिल्क मिल कॉलनीतील ५२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

काेठे किती मृत्यू 

आतापर्यंत घाटीत १११, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ३८, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १५० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 
उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

कोरोना मीटर -
बरे झालेले रुग्ण - १५०२
उपचार घेणारे रुग्ण - ११५४
एकूण मृत्यू  - १५०
आतापर्यंत बाधित रुग्ण - २८०६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT