Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची भर रस्त्यात छेड; वडील, मामांवर चाकू हल्ला

सुषेन जाधव

औरंगाबाद :  खासगी शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची भररस्त्यात छेड काढत तिचा हात धरून ओढला. यामुळे घाबरलेली मुलगी ओरडताच तिचे वडील आणि मामा धावत आले. त्यांच्यावर संशयिताने चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता गजानन नगरात घडला. या प्रकरणी संशयित ऋषीकेश पालोदकर याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयित ऋषीकेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीचे दोन आणि मारहाणीचे तीन, असे पाच गुन्हे दाखल असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडिता दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. ती मैत्रिणीसोबत पायी खासगी शिकवणीसाठी जाते. मागील काही दिवसांपासून ऋषीकेश पालोदकर हा तिला पाहून टोमणे मारत होता. परंतू, तीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आरोपी ऋषीकेशची हिंमत वाढली. दोन ते तीन दिवसांपासून तो तिचा पाठलाग करणे, तिच्या मागे-मागे चालणे, तिच्याकडे बघून टोमणे मारणे, अश्लील बोलणे, असे करीत होता. हा प्रकार तीने वडिलांना सांगितला. तेव्हा वडिलांनी तिला आपण पोलिसांत तक्रार करू, तू घाबरू नको, अशी हिंमत मुलिला दिली. परंतु, खासगी नोकरीला असलेल्या वडिलांना वेळेत घरी जाणे जमले नाही. त्यामुळे १ मार्च रोजी ते पोलिसांत तक्रार देण्यास जाऊ शकले नाहीत.


वडील, मामांवर केला चाकूहल्ला
२ मार्चला पिडिता मैत्रिणीसोबत शिकवणीला गेली. संध्याकाळी सात वाजता ती पायी घरी परतत असताना पून्हा संशयित ऋषीकेश आणि त्याचा अल्पवयीन जोडीदार रस्त्यावर आले. ते पीडितेच्या मागे-मागे चालत बराच अंतर गेले. त्यानंतर त्याने रस्ता अडवून शिटी वाजविली. पीडितेचा हात धरून तिला नाव विचारले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडिता घाबरून ओरडली. तिचा आवाज ऐकून वडील आणि मामा धावत आले. त्यामुळे आरोपी ऋषीकेश आणि त्याचा जोडीदार पळाले. मात्र, पीडितेच्या वडिलांनी आणि मामाने त्यांना अडवले. त्याचवेळी ऋषीकेशने चाकू उगारून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या भीतीने वडील आणि मामा मागे सरकले. तेवढ्यात तो पळून गेला. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास उपनिरीक्षक विठ्ठल घोडके करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT