Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

पत्नीचा निर्घृण खून करून परराज्यात पसार झालेल्या पतीचा लागला शोध, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील शहरालगत असलेल्या पिसादेवी (ता.औरंगाबाद) येथे पत्नीचे घरातील दागिने पतीने परस्पर विकले. हे पत्नीला समजल्यावर झालेल्या वादातून पत्नीचा खुन करून परराज्यात पळून गेलेल्या पतीला अखेर चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी गजाआड करून बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोणेर, ता. देवळा, जि.नाशिक) यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात ता.१७ फेब्रुवारी २०२१ रोजी फिर्याद दिली, कि जावई सिद्धेश गंगाशंकर त्रिेवेदी (वय ३५, रा.रूख्मिणी अपार्टर्मेन्ट, पिसादेवी, ता.जि.औरंगाबाद) याने मुलगी व त्याची पत्नी कविता हिस लोखंडी डंबेल्सच्या राॅडने व दगडाने डोक्यात गंभीर दुखापत करून तिची निर्घृण हत्या केली आहे व त्याचा मुलगा व मुलगी यांना सुध्दा जबर  मारहाण करून पळून गेला आहे.

यावरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात आरोपी सिध्देश त्रिवेदी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सिद्धेश त्रिवेदी हा बाहेर राज्यात दीव-दमण केंद्रशासित प्रदेशात चार ते पाच दिवसांपासून असल्याची गोपीनीय माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. तपास पथक दीव-दमण येथे पाठवण्यात आले. पोलिस पथक यांनी आरोपी सिद्धेश त्रिवेदी यास दीव-दमण केंद्रशासित प्रदेश येथून ताब्यात घेतले. औरंगाबाद येथे आणुन विचारपूस केली असता आरोपीने त्याची मृत पत्नी कविता हिस न विचारता तिचे कपाटात ठेवलेले दागिने, हार व पोत परस्पर विकले यावरून त्या रात्री दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते.

या कारणावरून आरोपी सिध्देश याने त्याच्या पत्नीस जिवे मारले व मुलांनाही जबर मारहाण करून पसार झाला होता. यावरून आरोपी सिद्धेश त्रिवेदी यास पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, पोलिस नाईक रविंद्र साळवे, पोलिस हवालदार दिपक सुरोशे, एस.बी घुगे  यांनी ही कारवाई केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT