amc aurangabad
amc aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

कचरा का ठरताेय विमानांसाठी धोकादायक वाचा...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्प सुरू होऊन सहा महिने उलटले असले तरी येथील सुमारे 50 ते 60 हजार टन कचऱ्याचा ढीग जागचा हललेला नाही. या कचऱ्याच्या ढिगावर आता विमानतळ प्राधिकरणाने आक्षेप घेतला आहे. कचऱ्यामुळे आकाशात पक्ष्यांचे प्रमाण वाढत असून, ते विमानांसाठी धोकादायक आहे, असे पत्र प्राधिकरणाने महापालिकेला दिले असल्याचे सूत्राने सांगितले. 

कचराकोंडीनतर महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात शासनाने 91 कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर मंजूर केला. त्यानुसार कामेही सुरू करण्यात आली मात्र फक्त चिकलठाणा येथील प्रकल्पाचे काम महापालिकेला पूर्ण करण्यात यश आले. सध्या चिकलठाणा येथील प्रकल्पात रोज सुमारे दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. असे असले तरी प्रकल्पाबाहेर पडून असलेल्या कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही.

प्रकल्प सुरू होण्यापूर्वी महापालिकेने पत्र्याचे शेड करून त्यात कचरा साठविला होता. त्यावर बायोकल्चर फवारण्यात आले; मात्र अद्याप कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली नाही. सुमारे 50 ते 60 हजार टन कचऱ्याचा डोंगर या ठिकाणी तसाच आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेला नुकतेच पत्र दिले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाल्यानंतरही उघड्यावर पडून असलेल्या कचऱ्यामुळे पक्ष्यांचा संचार वाढण्याची शक्‍यता असून, त्याचा विमानांना फटका बसू शकतो. त्यामुळे चिकलठाणा येथील कचऱ्याच्या ढिगासह विमानतळ परिसरातील इतर ठिकाणचा कचरा हटविण्यात यावा, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापौरांची घोषणा प्रत्यक्षात येईना 
जून महिन्यात चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाला. त्यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिवस-रात्र हा प्रकल्प चालवून चिकलठाणा येथील कचऱ्याचा ढीग संपविला जाईल, असे जाहीर केले होते; मात्र सहा महिने उलटले तरी ना प्रकल्प दिवस-रात्र सुरू झाला, ना कचऱ्याचे ढीग संपले. या कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरातील शेतकरीही त्रस्त आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT