court news.jpg 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना रुग्णांना म. फुले योजनेतून उपचार मिळेना ! खंडपीठात शपथपत्र दाखल.

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार मिळत नसल्याने, ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे. याचिकेच्या सुनावणीत सरकार तर्फे शपथपत्र दाखल करण्यात आले. पुढील सुनावणी एक आठवड्या नंतर होणार आहे. न्यायमुर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमुर्ती एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. आरोग्य उपसंचालक डॉक्टर स्वप्निल लाळे यांनी शासनातर्फे बुधवारी (ता. सात) शपथपत्र दाखल केले. 

सुनावणी दरम्यान ॲड अमरजितसिंग गिरासे यांनी विविध वर्तमानपत्रांच्या बातम्यांची कात्रणे सादर केली. याचिका दाखल झाली तेव्हा कोविडचे आठ लाख रुग्ण होते. त्यापैकी ६ लाख ३० हजार रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळावयास हवा होता.

माहिती अधिकाराखाली मिळविलेल्या माहिती नुसार राज्यभरातील केवळ ९ हजार रुग्णांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच औरंगाबाद मधील १७ हजार पैकी केवळ ६०० रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळाला. देशात एक लाख रुग्ण मृत्यू पावले त्यापैकी ३८ हजार रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांच्या वतीने सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी बाजू मांडली. विमा कंपनी तर्फे ॲड संतोष चपळगावकर यांनी बाजू मांडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT