old couple old couple
छत्रपती संभाजीनगर

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूनंतर वृद्ध आई-वडीलांनाही सोडले प्राण

कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे

अतुल पाटील

औरंगाबाद: कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक संजय नवले यांचे वडील माणिकराव व आई मंदाकिनी हे मृत्यू पावले आहेत.

या घटनेची माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ मार्च रोजी उपचार सुरु असताना औरंगाबादेत निधन झाले. नवले मुळचे चोराखळी (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील ते रहिवाशी होते. त्यांच्यावर याच दिवशी ऊस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेल्या आई-वडिलांना रक्तदाब कमी झाल्याने पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच माणिकराव तात्याबा नवले ( माजी शिक्षण अधिकारी, य ८०) यांचे शुक्रवारी (दि.२३) सायकांळी पाच वाजता निधन झाले. तर दोन तासातच आई मंदाकिनी माणिकराव नवले (वय ७८) यांनीही प्राण सोडला. रक्तदाब कमी झाल्यानंतर उपचार सुरू असतानाच याच दोघांचीही प्राणज्योत मालवली. नवले दांपत्याच्या पश्चात प्रा.अरविंद (शिवाजी महाविद्यालय, उदगीर) व सुनील (पुणे) ही दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, डॉ.संजय नवले यांच्या पाठोपाठ आई- वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी नवले कुटुंबियास पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT