व्हेंटिलेटर
व्हेंटिलेटर 
छत्रपती संभाजीनगर

पीएम केअर्स फंडामधून मिळालेल्या व्हेंटीलेटर्सचा घोळ सुटेना, पथक घाटीत आलेच नाही

मनोज साखरे

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (Governmental Medical College And Hospital) ‘पीएम केअर’ फंडातून (PM Cares Fund) १५० व्हेंटीलेटर मिळाले; पण त्यांचा दर्जा व रुग्णालयात प्रत्यक्षात रुग्णांसाठी उपयोग यावर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. नंतर व्हेंटीलेटर्सच्या (Ventilator) दुरूस्तीसाठी कंपनीचे अभियंते आले, दुरुस्तीही केली पण सर्व्हिस अहवाल न देताच परतले. व्हेंटीलेटर्सचे कार्य ‘जैसे थे’च आहे. गंभीर बाब म्हणजे, कोरोना काळ असताना व्हेंटीलेटरअभावी रुग्ण तडफडून मरत असताना केंद्र शासनाची कोणताही समिती अथवा पथक या व्हेंटीलेटर्स ऑडीटसाठी घाटीत आलेले नाही! रुग्णालयांना वितरीत करण्यात आलेल्या व्हेंटीलेटर्सचे ऑडीट करण्यासाठी पथक पाठविण्यात आल्याचे केंद्र शासन सांगत आहे. (Aurangabad Latest News Central Team Not Audit Ventilators In Ghati)

वैद्यकीय शिक्षण संचालकांना घाटीने असा दिला खुलासा

- व्हेंटीलेटर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये दाखल, अतिगंभीर रुग्णांच्या सेवेत वापरण्याजोगे नाहीत.

- १२ एप्रिलला तपासणी अहवाल तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.

- ज्योती सीएनसी कंपनीचे अभियंता सहदेव गुचकुंड आणि कल्पेश यांनी १८ एप्रिलला २५ व्हेंटीलेटर घाटीत बसविले.

- त्यांच्या समक्ष व्हेंटीलेटरचा वापर. परंतु दुसऱ्याच दिवशी व्हेंटीलेटर रुग्णसेवेतून परत. २० एप्रिलला सर्व २५ व्हेंटीलेटर परत.

या आहेत त्रुटी

अतिगंभीर रुग्णांच्या सेवेत वापरताना व्हेंटीलेटरमधून ऑक्सीजन पुरवठा योग्य प्रमाणात होत नव्हता. परिणामी रुग्णांना श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासामध्ये मदत होत नव्हती, उलट ऑक्सीजनची पातळी कमी होत होती. यामुळे रुग्णाच्या जिवीतास धोका होता व जोखीम घेऊन रुग्णांना वापरणे योग्य नव्हते. दरम्यान, व्हेंटीलेटर्स रुग्णालयात वापरायोग्य नसल्याने तातडीने रुग्णसेवेतून वॉर्डातून बाहेर काढण्यात आले. याची संपूर्ण कल्पना कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आली; परंतु अभियंता कुठलाही सर्व्हिस अहवाल न देता निघून गेले. त्यानंतर ज्योती सीएनसी कंपनीच्या अभियंत्यांना व्हेंटीलेटर दुरूस्तीसाठी संपर्क केला. २३ एप्रिलला ते घाटीत दाखल झाले. पण दुरूस्तीचा उपयोग झाला नाही व तेही सर्व्हिस अहवाल न देता तसेच निघून गेले.

सर्व व्हेंटीलेटर्स बंद पडून

वारंवार संपर्क करुन अभियंते आले नाहीत. त्यानंतर १४ मेरोजी ज्योती सीएनसी कंपनीचे राजेश रॉय आणि आशुतोष गाडगीळ घाटीत दाखल झाले. त्या दिवशी दोन व्हेंटीलेटर दुरुस्त केले. दोन्ही व्हेंटीलेटर वॉर्डात वापरासाठी पाठविण्यात आली असता दोन्ही बंद पडले. कंपनीचे हेही अभियंते कोणताही सर्व्हिस रिपोर्ट न देता निघून गेले. आजपर्यंत उर्वरीत ३७ व्हेंटीलेटर पडून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT