Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

बाहेरच्या उमेदवाराला लाथ घाला, औरंगाबादेत कोण म्हणतंय

प्रकाश बनकर

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची वॉर्डा-वॉर्डात तयारी सुरू झाली आहे. इच्छुकांनी बॅनरबाजी सुरू करत फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. जयभवानी नगरात (वॉर्ड क्र.८७) स्थानिक व बाहेरचा उमेदवार असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

‘स्थानिक उमेदवाराला साथ, बाहेरच्या उमेदवाराला लाथ’ असा मजकूर लिहिलेले होर्डिंग्ज जयभवानी नगरात रात्रीतून झळकले आहेत. हे होर्डींग चर्चेचा विषय ठरत आहेत. 

जयभवानी नगर- १३ योजना (वॉर्ड क्र.८७) या वॉर्डमध्ये भाजपच्या मनीषा मुंडे या विद्यमान नगरसेविका आहेत. मात्र यावेळी हा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे वॉर्डात अनेक नवे इच्छुक तयार झाले आहेत. अनेकांनी तर बॅनरबाजी सुरू केली आहे.

दरम्यान प्रमुख राजकीय पक्ष बाहेरचे उमेदवार देण्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कुणा स्थानिक इच्छुकाने रात्रीतून वॉर्डात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यावर बाहेरील उमेदवारांना विरोध असल्याचा मजकूर आहे.

वॉर्डातील नागरिकांची अशीच इच्छा असल्याचे बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे. स्थानिकांना याविषयी विचारले असता, हे बॅनर नागरिकांनी लावलेले नाही. त्यामुळे हे वार्डातील इच्छुकांनी नागरिकांच्या माध्यमातून बॅनर झळकवत बाहेरच्या उमेदवारास विरोध दर्शविली असल्याची शक्यता नागरिकांतर्फे वर्तविण्यात येत आहे. 

असा आहे बॅनरवरील मजकूर 

जय भवानी नगर १३ वी योजना वॉर्ड क्र. ८७ 

स्थानिक जनतेचे जाहीर आवाहन 
स्थानिक उमेदवाराला साथ, बाहेरच्या उमेदवाराला लाथ. 

  • आमचा नगरसेवक आता स्थानिकच हवा...! 
  • स्वयंघोषित प्रतिष्ठित दलाल यांना आयाराम गयाराम उमेदवार आर्थिक पुरवठा करत आहे. 
  • आपले स्वयं घोषित प्रतिष्ठित दलाल त्यांना मदत करत आहे. त्या दलालापासून सावधान. 
  • स्थानिक उमेदवारानांच सपोर्ट करणे. 
  • आपल्या वॉर्डामध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही. 
  • स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्या, बाहेरील उमेदवारांना घरचा रस्ता दाखवा. 
  • माझा वॉर्डमाझा परिवार 
  • बाहेरचा उमेदवार हा समस्या सोडवण्यासाठी नाही तर, पाच वर्षात स्वतःची तिजोरी भरण्यासाठी येत आहे. 
  • समस्त जय भवानीनगरवासीयांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, इथून पुढे जो कोणी नगरसेवक निवडून येईल, तो फक्त आणि फक्त स्थानिकच असेल. बाहेरच्यांना येथील समस्या (सुख-दुख, पाणी लाइट ड्रेनेज,रस्ते) माहिती नाही. अशांनी येथून निवडणूक लढविल्यास डिपॉझिट जप्त करण्यात येईल. 

आवाहनकर्ते : समस्त जय भवानी नगर, १३ वी योजना, ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT