mahapalika news.jpg
mahapalika news.jpg 
छत्रपती संभाजीनगर

आयुष्य संपलेली पाणी पुरवठा यंत्रणा चालविण्याची महापालिकेवर नामुष्की

माधव इतबारे

औरंगाबाद :  महापालिकेच्या सध्या कार्यरत असलेल्या दोन्ही पाणीपुरवठा योजनांचे आयुष्य संपले आहे. लोकसंख्या केवळ सहा लाख असताना कार्यान्वित झालेल्या याच योजनांवर आज सुमारे १७ लाख लोकसंख्येचा भार असून, यातील एक योजना ४५ वर्षांपूर्वीची आहे, तर दुसऱ्या सुधारित योजनेलाही २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या या योजनांवर शहराची तहान भागविताना पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. 


आज घडीला शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे; मात्र नागरिकांची मूलभूत गरज असलेले पाणी देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेच्या नादात शहराची दहा वर्षे गेली. त्यामुळे सध्या पाणीपुरवठा खऱ्या अर्थाने ऑक्सिजनवर आहे. १९७५ व १९९१-९२ मध्ये टाकण्यात आलेल्या पाइपलाइनवर महापालिकेची आजही मदार आहे. शहराला सध्या दररोज तब्बल २०३ पेक्षा जास्त एमएलडी शुद्ध पाण्याची गरज आहे, तर या दोन्ही योजनांची मिळून पाणी उचलण्याची क्षमता केवळ १५० एमएलडी आहे. महापालिका दररोज १३५ ते १४० एमएलडी पाणी (पावसाळ्यात) उचलते. यातील १२५ ते १२८ एमएलडी पाणी शहरापर्यंत येते. त्यामुळे आज नाथसागर काठोकाठ भरला असला तरी महापालिकेकडे शहरापर्यंत पाणी आणण्यासाठीची यंत्रणा नसल्याने नागरिकांच्या घशाची कोरड कायम आहे. 

रोजच तारेवरची कसरत 
१९७५-७६ मध्ये शहराची एक लाख ७० हजार लोकसंख्या असताना नाथसागरातून ७०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. त्यानंतर शहराची पाच लाख ९२ हजार लोकसंख्या असताना १२९९ मिलिमीटर व्यासाची १०० एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा योजना १९९२ मध्ये कार्यान्वित झाली. आज शहराची लोकसंख्या १७ लाख झालेली असताना मदार याच योजनांवर आहे. जीर्ण झालेली योजना कधीही बंद पडून शहरवासीयांवर पाणी पाणी करण्याची वेळ कधीही येऊ शकते? अशी भीत व्यक्त केली जात आहे. 

हर्सूल तलावाची साथही तोकडी 
१९५४ मध्ये हर्सूल तलावातून जुन्या शहरासाठी पाणीपुरवठा योजना सुरू झाली. १४ वर्षांनंतर हर्सूल तलाव भरल्यामुळे सध्या चार ते पाच एमएलडी पाण्याचा वापर करून १२ वॉर्डांची तहान भागविली जात आहे. मात्र, हे पाणीदेखील गरजेचा विचार करता अपुरे आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT