Aurangabad amc news 
छत्रपती संभाजीनगर

नऊ मार्चला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदारयाद्या

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वॉर्डरचना अंतिम केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम महापालिकेला आखून दिले आहे. त्यानुसार नऊ मार्चला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केल्या जाणार असून, त्यावर आक्षेप घेण्यासाठी आठ दिवसांचा म्हणजेच १६ मार्चपर्यंतचा अवधी दिला जाणार आहे. २३ मार्चला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ३१ जानेवारीची मतदारयादी गृहीत धरण्याचे आदेश यापूर्वीच आयोगाने दिले आहेत. 

महापालिकेची एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असून, तीन फेब्रुवारीला आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर प्रारूप वॉर्डरचना तयार करण्यात आली होती. त्यावर सुमारे ३७० आक्षेप घेण्यात आले. दरम्यान, १५ फेब्रुवारीला या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली व सोमवारी (ता. २४) वॉर्डरचना अंतिम करण्यात आली. आता त्यापुढील म्हणजेच मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठरवून दिला आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या मतदारयाद्या महापालिका वार्डनिहाय फोडल्या जाणार आहेत. या प्रारूप याद्या नऊ मार्चला प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर नऊ मार्च ते १६ मार्च अशी वेळ आक्षेप दाखल करण्यासाठी देण्यात आली आहे. आक्षेप सुनावणीनंतर २३ मार्चला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. 
 
नवीन मतदारांना मिळणार नाही हक्क 
सध्या नवीन मतदारांची नोंदणी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच या मतदारांचा आपल्याला उपयोग होईल, म्हणून अनेक इच्छुक मतदार नोंदणी करून घेत आहेत; मात्र निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपर्यंतच्या मतदारयाद्या गृहीत धरण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे जानेवारीनंतर नोंदणी झालेल्या नवमतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार नसल्याचे सिद्ध झाले आहे; मात्र आयोग ऐनवेळी ही मुदत वाढवू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत CNG महागला, महानगर गॅसने पुन्हा दरात केली वाढ; जाणून घ्या किती आहे दर?

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; सोनं ५ हजार तर चांदी ३० हजारांनी घसरली

Madhya Pradesh Foundation Day: मध्य प्रदेशचा ७१ वा स्थापना दिन; ‘वारशाचा गौरव, विकासाची नवी झेप’ हीच राज्याची नवी ओळख : मुख्यमंत्री

PAK vs SL Final: एका सामन्यात ६५६ धावा अन् १० विक्रमांचा धुरळा! भारताचा २४ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला; नेमकं काय घडलं?

Ujani Project: पुणे-सोलापूर मार्गावर ‘रास्ता रोको’; उजनी परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटरला विरोध

SCROLL FOR NEXT