Aurangabad amc news 
छत्रपती संभाजीनगर

प्राणिसंग्रहालयात हरणाचा बळी 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची परवड सुरूच आहे. पत्र्याच्या शेडसाठी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या आठवड्यात पावसात भिजून आजारी पडल्याने एका हरणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हरणाचा बळी गेल्यानंतर मात्र प्रशासनाने तातडीने पत्र्याचे शेड उभारले. 

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले पिंजरे, प्रशासनातर्फे निधीसाठी केली जाणारी कुचराई यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द केली होती. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांसह लोकप्रतिनिधींनी दिल्लीत धाव घेऊन महापालिकेतर्फे आपले म्हणणे मांडले. त्यानंतर प्राधिकरणाने एका वर्षासाठी मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ देताना मिटमिटा भागातील सफारी पार्क तातडीने विकसित करण्यात यावे, प्राण्यांसाठी सोयी-सुविधा द्याव्यात अशा अटी टाकण्यात आल्या होत्या; मात्र मुदतवाढ मिळताच प्रशासनाने पुन्हा प्राणिसंग्रहालयाकडे दुर्लक्ष केले. छोटी-छोटी कामे गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

प्राणिसंग्रहालयात मोठ्या प्रमाणात हरीण, काळवीट असून, त्यांना उन्हाळ्यात सावली म्हणून व अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यासाठी प्राणिसंग्रहालय विभागाने कार्यकारी अभियंता विभागाला पत्र देण्यात आले होते; मात्र सहा महिने उलटूनही या ठिकाणी शेड उभारण्यात आले नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात तीनवेळा अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात भिजल्याने एक हरीण, तीन काळवीट आजारी पडले. यातील हरणाचा त्यानंतर मृत्यू झाला. ही बाब समोर येताच कार्यकारी अभियंता विभागाने याठिकणी पत्र्याचे शेड उभारण्याचे काम हाती घेतले. 
 

प्राणिसंग्रहालयात अत्यावश्‍यक छोटी-मोठी कामे करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील बैठक घेऊन कामे करण्याबाबत सूचना केल्या. त्याचा संदर्भ देऊनही पत्र देण्यात आले. दरम्यान, अवकाळी पावसात भिजल्याने प्राणी आजारी पडले होते. २७ मार्चला निमोनिया आजाराने एका हरणाचा मृत्यू झाला. 

 बी. एस. नाईकवाडे, प्राणिसंग्रहालय संचालक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT