download (3).jpg 
छत्रपती संभाजीनगर

Breaking news : औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदी सुनिल चव्हाण यांची नियुक्ती

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद :  औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदी महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक असलेले सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर औरंगाबादला कोण येणार याची चर्चा सुरु होती. सोमवारी (ता. १७) या चर्चोला पुर्णविराम मिळाला.

जिल्हाधिकारी उदय चौधरी हे दोन वर्षापुर्वी औरंगाबादला रुजू झाले होते. तत्कालिन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला होता. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी चौधरी हे अधिक फोकसमध्ये आले होते. उदय चौधरी यांची सोमवारी (ता. दहा) मंत्रालयात बदली झाली. 

त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे पदभार सोपवला होता. तेंव्हापासून जिल्हाधिकारी पदी कुणाची नियुक्ती होते, याबद्दल चर्चा करण्यात येत होती. अखेर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची वर्णी लावण्यात आली. सुनिल चव्हाण हे ३ एप्रिल २०२० रोजी महावितरणच्या सेवेत रुजु झाले होते. अवघ्या तीन महिन्यात त्यांची महावितरणमधून औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

मराठवाड्याचे सुपुत्र
मराठवाडयाचे भूमीपुत्र असलेले सुनील चव्हाण हे २००७ च्या आयपीएस बँचचे अधिकारी आहे. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून एम.एसस्सी. कृषी-मृदा आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यापुर्वी त्यांनी मंत्रालयात मुंबई येथे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी ठाणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून साडे तीन वर्ष काम पाहिले आहे. ठाणे महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करतांना ५५०० कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करून १५० पेक्षा जास्त योजना राबविल्या. तसेच अतिरिक्त आयुक्त म्हणून १८००० पेक्षा जास्त बेकादेशीर व अवैध बांधकामांवर कार्यवाही केली होती त्यामुळे धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

CNG Price Hike: मुंबईत १५ दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ; नवा दर किती? रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार?

Latest Marathi News Live Update: काझीरंगातील भीषण अपघातात २ वर्षांचा चिमुरडा बचावला; आई-वडिलांचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT