File Photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरामध्ये लॉकडाऊनचे आदेश मोडणाऱ्या ४४ जणांवर गुन्हे 

मनोज साखरे

औरंगाबाद - शहरामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय अथवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी शिवाय घराबाहेर निघू नये असे प्रशासनाने आवाहन केले.

तरीही लॉकडाऊनचे आदेश मोडणाऱ्या ४४ जणावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 
विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. शहरांमध्ये विनाकारण फिरणारे तसेच मज्जाव असतानाही दुकान उघडणारे आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यात विनाकारण फिरणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, दोन दुकानदाराचा ही यात समावेश आहे. एका तंबाखू जन्य पदार्थ विक्री त्यावरही कारवाई झालेली आहे. त्यांच्यावर कडक कार्यवाही ही करण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

आतापर्यंत जमावबंदीच्या काळात १४४ लोकांवर लॉकडाऊन, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोमवारपासून (ता. ३०) आणखीन कडक स्वरूपाची कारवाई केली जात आहे.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विनाकारण रस्त्यावर फिरू नये. आपापल्या घरातच सुरक्षित राहावे अन्यथा कायद्यायचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

Nashik News : 'नो पार्किंग'चे फलक फक्त शोभेचे! सिडकोमध्ये वाहने सर्रास थांबवली जातात

Wani News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू; मुलाचा आरोग्य केंद्रात आत्मदहनाचा प्रयत्न

Katraj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादन कामाला मिळणार गती; कात्रजमधील मोजणी प्रक्रिया पूर्ण, कोंढव्यातील काम सुरु

SCROLL FOR NEXT