संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

कनिष्ठ कर्मचारी वेळेवर आले अन् वरिष्ठ अधिकारी उशीरा

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद-शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्याची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून सुरू झाली. मात्र, सोमवारी (ता.दोन) कार्यालयात येण्याची आणि जाण्याची वेळ किती कर्मचाऱ्यांनी पाळली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरीचे यंत्र बंद असल्यामुळे बहुतांश विभागांतील कर्मचाऱ्यांची हजेरी मस्टरवरच लागली. त्यामुळे कोण किती वाजता दाखल झाले? याची नोंदच प्रशासनाकडे नसल्याचे समोर आले. 

जेवणाची अशीही सुटी
कनिष्ठ कर्मचारी वेळेवर आले आणि गेल्याचे दिसून आले. वरिष्ठ अधिकारी लेटलतीफ राहिले, त्यांचे कुणी मालक नसल्याप्रमाणे ते कधी कामावर आले आणि गेले, हे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समजले नाही. दुपारच्या जेवण्याच्या सुटीसाठी एक ते दोनमधील अर्धा तास दिलेला असताना तीनपर्यंत अनेक अधिकारी, कर्मचारी जेवणाच्या सुटीवर होते. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले, की सोमवारी पाच दिवसांच्या पहिल्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सगळ्याच कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. 
पाच दिवसांचा आठवडा आणि शासकीय कामासाठी आठवड्याचा पहिलाच दिवस यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होती. 

हाफ डे गृहीत धरणार
महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले, की विभागीय आयुक्तालयात जमीन व इतर प्रकरणात सुनावणी सुरू होती. महिन्यातून किंवा सलग तीन वेळा शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे वेळेत कामावररुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार आहे. त्यांचा ‘हाफ डे’ गृहीत धरला जाणार आहे. तसेच त्यांची एक किरकोळ रजा देखील आपोआप रद्द होईल. शासनाच्या अध्यादेशामध्ये तीन वेळा कामावर उशीर झाल्यास सुटी रद्द करणे आणि ‘हाफ डे’ ची नोंद घेण्याची तरतूद आहे. 

जिल्ह्यात लिपिक १७६ आहेत. अव्वल कारकून १६५ आहेत तर १०७ शिपाई कर्मचारी आहेत. १८ वाहनचालक असून ५५ नायब तहसीलदार आहेत. १५ तहसीलदार आहेत तर १५ उपजिल्हाधिकारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ८० लिपिक आहेत, ६३ अव्वल कारकून आहेत. शिपाई ५७ आहेत. वाहनचालकांची संख्या पाच आहे. तर सहा नायब तहसीलदार, आठ उपजिल्हाधिकारी व इतर विभागाचे दोन कर्मचारी कार्यरत आहेत. १०० टक्के कर्मचारी वेळेत आले. 
रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन विभाग
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: कोकणात जन्म; अनेक पदे भुषवली, पण स्वातंत्र्य लढ्यातील वक्तव्यानं अनभिषिक्त...; ठाकरेंनी उल्लेख केलेले स.का.पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT