crime.jpg
crime.jpg 
छत्रपती संभाजीनगर

लाजेलाही वाटावी लाज...! मतिमंद मुला-मुलींना घातली एकत्र नग्न आंघोळ ! 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : मतिमंद मुलांना नग्न अवस्थेत एकत्रित आंघोळ घातल्याच्या प्रकार जटवाडा रोड येथील शाळेत उघड झाला. या प्रकरणी समाजकल्याण आयुक्तालयाच्या आदेशानंतर संस्थेच्या अधीक्षकापासून ते पहारेकरी अशा तेरा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहरातील जटवडा रोड परिसरात मतिमंद मुलांची शाळा आहे. या शाळेमध्ये मुलींसह ५ ते १७ वयोगटातील निवासी विद्यार्थ्यांचा सामावेश आहे. या शाळेतील मुलांसाठी वसतीगृहाची सोय आहे. मुलांचे भोजन, नाष्टा, कपडे, शालेय साहित्य पुरवण्यापासून ते राहण्यापर्यंतची सोय संस्थेने करणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाकडून अनुदानही दिल्या जाते. 

समाजकल्याण निरिक्षकांनी १३ मार्च २०२० रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास भेट दिली, त्यावेळी संस्थेच्या आवारात मतिमंद मुले- मुली यांना एकत्रिच नग्न अवस्थेत आंघोळ घालण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे यावेळी काळजीवाहक उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत अशा किळसवाण्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अंघोळ घालण्यात येत असल्याचे लक्षात आले. विद्यार्थांना वेळेवर नाष्टा देणे अपेक्षित असताना साडेनऊपर्यंत नाष्टा देण्यात आला नव्हता. 

विद्यार्थ्यांच्या नग्न अवस्थेतील आंघोळीची समाजकल्याण निरीक्षकांनी व्हिडीओ शुटींग केली. त्यानंतर समाजकल्याण आयुक्तालयाला अहवाल सादर केला. आयुक्तांच्या आदेशानंतर तातडीने विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरीत करण्यात आले. तब्बल पाच महिन्यांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

त्यानंतर समाजकल्याण निरिक्षक एस. डी. साळुंके यांच्या तक्रारीवरुन वसतीगृह अधीक्षक साजिद बादशाह पटेल, योगेश राठोड, काळजीवाहक निंबाळकर, मदतनीस शेख जाकीर, पहारेकरी संतोष पवार यांच्यासह तेरा जणांविरोधात दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ कलम ९२ तसेच बालकांचे न्याय काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ कलम ७५, भादंवि ३४, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT