Aurangabad News Sexual Exploitation of a Minor Girl 
छत्रपती संभाजीनगर

बेचाळीस वर्षाचा तो अन सोळा वर्षाची ती, काय झालं वाचा...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : तो सोळा वर्षीय मुलीच्या घराशेजारीच राहायचा. त्याने तिच्याशी लगट केली. मग लग्नाच्या आणाभाका घेऊन पळवुन नेले. लग्नही केले. पण ती अल्पवयीन निघाली.

ती अल्पवयीन असल्याबाबत खरे-खोटे पडताळण्यासाठी वैद्यकीय तपासणीही केली, शाळेतून जन्मतारखेबाबत कागदपत्रेही मिळविली मग ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले अन..बेचाळीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत अटकही केली. सोमवारी (ता. तीन) ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार राहुल दादाराव शिंगारे (वय 42, रा. सातारा परिसर) असे संशयिताचे नाव आहे. तो महापालिकेच्या वसुलीचे काम करतो. संशयित पूर्वी पीडितेच्या शेजारी राहत होता. त्याने सोळा वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळविले होते.

शहरातील विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी भागात त्याने लग्नही केले. दरम्यान, पीडितेच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार सातारा ठाण्यात दिली. परंतु, संशियताने थेट लग्नाचे प्रमाणात्र सादर केले. यानंतर मुलगी अल्पयीन असल्याबाबतचे प्रकरण समोर आले. यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले.

पीडितेच्या नातेवाईकांनी रिट पिटीशन दाखल केल्यामुळे न्यायालयाने वयाची खात्री करण्याचे आदेश अहमदनगर बाल कल्याण समितीला दिले. समितीने पीडितेला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देत तिला औरंगाबादला पाठविले.

औरंगाबाद बाल कल्याण समितीने शासकीय रुग्णालयात हाडांची तपासणी करून पीडितेच्या वयाचा अंदाज घेतला. तेव्हा तिचे वय सोळा ते सतरा वर्षे असल्याचे सांगण्यात आले. त्यादरम्यान पीडितेचा जन्मप्रमाणपत्र जालना जिल्ह्यातून प्राप्त झाले. त्यात तिची 14 सप्टेंबर 2002 असल्याचे समोर आले होते.

पीडिता अल्पवयीन असल्याचे समोर आल्यावर अखेर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अपहरण करणे, बळजबरी लग्न करणे, पीडिता गर्भवती असल्याने बलात्कार व पोक्‍सो कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यानंतर सातारा पोलिस पथकाने संशयिताला अटक केली आहे.

हेही वाचा :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT