mother security news esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेचा एक लाख जणांना लाभ

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

सकाळ डिजिटल टीम

औरंगबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येत असून, आत्तापर्यंत या मोहिमेत एक लाख १२ हजार ३६२ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. १० नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

महापालिकेच्या गणेश कॉलनी, जिन्सी, पीरबाजार, नारेगाव, राजनगर या आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवारी (ता. २१) शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात नऊ हजार ४७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात स्तनाच्या कॅन्सर संदर्भात मॅमोग्राफी चाचणी केली जात आहे. आजपर्यंत १३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या चाचणीसाठी खासगी रुग्णालयात दीड हजार रुपये खर्च येतो. गर्भाशय मुखाचा कर्करोग निदान करण्यासाठी पॅप स्मिअर तपासणी केली जात आहे, त्यासाठी ७०० रुपये खर्च येऊ शकतो. रक्त तपासणीसाठी खासगी रुग्णांलयात दोन हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो. ही तपासणी सुद्धा मोफत करण्यात येत आहे.

दरम्यान शुक्रवारी जिन्सी, शहागंज डॉ. झाकिर हुसैन हायस्कूल येथे शिबिराला खासदार इम्तियाज जलील यांनी भेट देऊन कौतुक केले. शनिवारी (ता. २२) पुंडलिकनगर, शहाबाजार, विजयनगर, जयभवानीनगर आरोग्य केंद्राअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

Vasai-Virar News : आदर्श महापौर! सत्तेचा मोह सोडला, ८५ हजारांचे मानधन नाकारले; वसई-विरार महापौरांच्या निर्णयाचा राज्यभर डंका

SCROLL FOR NEXT