Suhas Dashrathe
Suhas Dashrathe esakal
छत्रपती संभाजीनगर

'राजसाहेब माझं काय चुकलं, मी काम करतोय'

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अस्वस्थता दिसत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरुन हटवले गेले आहे. त्यातच बुधवारी पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्ष सोडला असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत (Shiv Sena) आलेले दाशरथे पक्ष कारवाईमुळे अस्वस्थ झाले असल्याचे सांगितले जात आहे. राजसाहेब माझं काय चुकलं. मी काम करतोय. पक्ष बांधणीसाठी (Aurangabad) काम करतोय, असे सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. माझे काय चुकले हा प्रश्न मनात असल्याची खंत त्यांनी व्यक्त बोलून दाखवली. पक्ष सोडण्यावर ते म्हणाले, माझ्याकडे फक्त दोन गोष्टी आहेत. एक निष्ठा आणि दोन स्वाभिमान.(Aurangabad Politics Suhas Dashrathe Not Quit MNS, He Said Continue With Party)

याच गोष्टींवर काम करित असल्याचे सांगून सुहास दाशरथे म्हणाले, की राजसाहेब जो निर्णय घेतील. त्या प्रमाणे काम करेल. राज ठाकरे हे मंगळवारी (ता.१४) औरंगाबाद दौऱ्यावर होते. आगामी मराठवाड्यासह महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheetal Mhatre : ''खासदारकीसाठी तुम्ही दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?'', शीतल म्हात्रेंचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

Lok Sabha Election: मतदान करा अन् मोफत मिळवा पोहे-जिलेबी, सिनेमाचं तिकीट.. कुठे मिळतायत या भन्नाट ऑफर्स? जाणून घ्या

Sharad Pawar : ...आणि शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला!

Sikandar: ठरलं! 'सिकंदर'मध्ये सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार 'ही' अभिनेत्री

SCROLL FOR NEXT