Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

शिळा भात दिल्याची तक्रारीने कोविड सेंटरमध्ये गोंधळ, भाताऐवजी दिले पोहे

मधुकर कांबळे

औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये रविवारी (ता.१४) नाष्टयाच्या वेळी मोठा गोंधळ उडाला. नाष्टयात दिलेला भात शिळा असल्याची तक्रार करत सर्वच रुग्ण तळमजल्यावर जमा झाले. या प्रकार समजताच पुरवठादाराने धाव घेत रुग्णांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पुरवठादाराने आधीचा नाष्टा परत घेत काही वेळातच दुसरा नाष्टा पाठविला. कोविड सेंटरमध्ये बाधितांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी कोवीड केअर सेंटरमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद उत्पन्न होत आहेत.

गेल्या काही दिवसात शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला तसे महापालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोवीड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. आठवडाभरापासून येथे कोरोना रुग्ण दाखल करुन घेतले जात आहेत. सध्या या ठिकाणी मुलाचे आणि मुलीचे वसतीगृह अशा दोन इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी कोरोनाचे सुमारे २५० रुग्ण आहेत. रविवारी (ता.१४) सकाळी नेहमीप्रमाणे महापालिकेच्या पुरवठादाराकडून इथे रुग्णांसाठी नाष्टा पाठवण्यात आला. नाष्टयात फोडणीचा भात होता, परंतु हा भात शिळा असून त्याचा वास येत असल्याची काही रुग्णांनी तक्रार केली.

त्यानंतर थोड्या वेळातच पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील रुग्ण तळमजल्यात जमले. त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात झाली. हा गोंधळ सुरू असतानाच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुरवठादाराला बोलावून घेतले. पुरवठादार एजन्सीच्या प्रतिनिधीने तातडीने येऊन रुग्णांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हा भात ताजाच असून तो चार कोवीड केअर सेंटरमध्ये पुरविला आहे, दुसऱ्या कुठूनही तक्रार आलेली नाही, असा युक्तीवाद पुरवठादाराच्या प्रतिनिधीने केला. परंतु रुग्णांनी ऐकण्यास नकार दिला.

त्यानंतर संबंधित पुरवठादाराने दुसरा नाष्ता पुरविण्याची तयारी दर्शविली. थोड्या वेळानंतर रुग्णांना पोहे दिल्यानंतर या घटनेवर पडदा पडला. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोवीड सेंटरमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वाद होत आहेत. या ठिकाणी काही रुग्ण बाहेरुन डबा मागविण्याच्या नावाखाली दारुही मागवत आहेत. त्याला आक्षेप घेतला तर कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला जात आहे. या प्रकारांमुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात पत्र देऊन पोलिस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली असल्याची माहिती दिली.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

SCROLL FOR NEXT