zp office 11.jpg
zp office 11.jpg 
छत्रपती संभाजीनगर

पाच दिवसांच्या लॉकडाऊननंतर मिनी मंत्रालयात पुनश्य हरिओम !

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्हा परिषद मुख्यालयातील पंचायत विभागातील एका अधिकाऱ्याला तसेच वित्त व ग्रामीण पुरवठा विभागातील कर्मचार्यांना कोरोनाची झाली होती यामुळे बुधवार (ता.०३) पासून लॉकडाऊन असलेले मुख्यालयात सोमवार (ता. १०) पुनश्य पूर्वी प्रमाणेच कामकाजास सुरुवात झाली.

तब्बल पाच दिवसांच्या विश्रांती नंतर सोमवारपासून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाल्याने विविध विभागातील अधिकरी, कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीतीमुळे जिल्हा परिषेद मुख्यालय पुन्हा पूर्वी प्रमाणेच गजबजल्याचे दिसून आले.

खबरदारी म्हणून घेतला लॉकडाऊनचा निर्णय 
एक अधिकारी तसेच विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. अन्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी आणि पदाधिकारी देखील भीतीच्या सावटाखाली कामकाज होते. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी खबरदारीचा म्हणून तसेच कोरोनाची साखळी तुटण्यासाठी मदत व्हावी म्हणुन जिल्हा मुख्यालय लॉकडाऊन ठेवण्याचे बुधवार (ता.०३) ते शुक्रवार (ता.०७) तीन दिवस जिल्हा मुख्यालयात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत लॉकडाऊन आदेश काढले होते.

तीन दिवसांच्या लॉकडाऊन नंतर शुक्रवारला लागूनच दुसरा शनिवार आणि आल्यामुळे तब्बल पाच दिवस बंद होते. त्यामुळे या पाच दिवसांमध्ये आरोग्य विभागाचेच कर्मचारी उपस्थित दिसून आले व सर्वत्र सन्नाटा दिसून आला. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हय परिषद मुख्यालय तसेच सर्व विभागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. 

वर्क फ्रॉम होमचा होणार आढावा 
या लॉकडाऊन दरम्यान अधिकारी कर्मचार्यांनी वर्क फ्रॉम होम करावे असे आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या अधिकारी व कर्मचार्यांनी वर्क फ्रॉम होम केले याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदवले घेणार काय ? आणि ज्यांनी ज्यांनी आदेशाचे पालन केलेले नसेल अश्यावर काय कार्यवाही करणार कि त्यांच्या रजा लावणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉ. गोंदावले गांभीर्याने दाखल घेणार कि वर्क फ्रॉम होम नुसार काम करावे असे त्या आदेशामध्ये नुसतेच नमूद करण्यात आले होते असा प्रश्नहि आता उपस्थित आहे.

(Edit-Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT