aurangabad news esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : स्वच्छ भारत अभियानात औरंगाबादचे रॅंकिंग आठ टक्क्यांनी घसरले

यंदा औरंगाबादला देशभरात ३० वी रॅंकिंग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : केंद्र शासनाने शनिवारी (ता. एक) स्वच्छ भारत अभियानाची रॅंकिंग जाहीर केली असून, त्यात महापालिकेचा टक्का आठने घसरला आहे. गतवर्षी महापालिकेला २२ वा रॅंक मिळाला होता. यंदा देशभरात ३० वी रॅंकिंग मिळाली आहे. राज्य पातळीवर दहा शहरांमध्ये औरंगाबादचा क्रमांक नववा आला आहे. केंद्र शासनाने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी स्वच्छ भारत अभियानाचा निकाल जाहीर केला.

त्यात नेहमीप्रमाणे मध्यप्रदेशातील इंदूर शहराने सहाव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला. ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा शहरांसाठी दरवर्षी केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार विविध निकषांच्या आधारे ही स्पर्धा होते. स्पर्धेत सहभागी शहरांनी निकषानुसार काम केले आहे किंवा नाही, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली एजन्सी शहरात येऊन पाहणी करते. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी एजन्सीचे प्रतिनिधी औरंगाबाद शहरात आले होते. त्यांनी पाच दिवस शहराच्या विविध भागात फिरून सर्वेक्षण केले.

या स्पर्धेचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. त्यात देशपातळीवर ४५ शहरांमध्ये औरंगाबाद शहराचा क्रमांक ३० वा आला आहे. गतवर्षी औंरगाबाद शहराचा बाविसावा क्रमांक होता. राज्य पातळीवर दहा शहरांमध्ये औरंगाबाद नवव्या क्रमांकावर आहे. गतवर्षी औरंगाबाद सहाव्या क्रमांकावर होते. देश व राज्य पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबादची घसरण झाली आहे. ‘टॉप टेन’चे होते स्वप्न यंदा टॉप टेनपर्यंत मजल मारण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली होती. साडेसात हजार गुणांच्या या स्पर्धेत सिटीझन्स व्हाइस, महापालिकेच्या सेवांचा दर्जा व कागदपत्रांचे सादरीकरण अशा तीन टप्प्यांमध्ये गुण देण्यात आले.

कोविड काळात महापालिकेने केलेल्या कामांना देखील गुण दिले जाणार होते. पण यंदा स्वच्छ भारत अभियानात महापालिकेला भरीव कामगिरी करता आली नसल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुर्गंधीमुक्ती न झाल्याने बसला फटका केंद्र शासनाने दुर्गंधीमुक्त शहर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मागेल त्याला स्वच्छतागृहासाठी अनुदान देण्यात आले. गतवर्षी या निकषांतर्गत औरंगाबादला ओडीएफ-प्लस प्लस असे रँकिंग मिळाले होते. यंदा केवळ ओडीएफ प्लस असे रँकिंग मिळाले आहे. त्यामुळे सुमारे चारशे गुणांचा फटका बसला आहे. त्यामुळे औरंगाबादची पीछेहाट झाली, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

SCROLL FOR NEXT