विमा वाहन.jpg 
छत्रपती संभाजीनगर

वाहनाचा विमा नाही, आयुष्य होईल उद्ध्वस्त !  

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : वाहनाचा विमा पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेणे इतक्यापुरताच महत्त्वाचा नाही. तर अपघातानंतर आर्थिक नुकसानीपासून सावरण्यासाठी विमा महत्त्वाचा आहे. वाहनाचा विमा नसेल तर कदाचित आयुष्य उद्‍‍ध्वस्त होऊ शकते. 


आयुष्यात चारचाकी हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. जेव्हा चारचाकी घेताना मोठी गुंतवणूक केली जाते. अनपेक्षित नुकसानीपासून वाचण्यासाठी सर्व कागदपत्रे आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करून विम्याची तरतूद केली जाते. दुर्दैवाने जर वाहनाला अपघाताने कुठलेही नुकसान झाले तर विमा कंपनी पॉलिसीप्रमाणे तुम्हाला तुमच्या दाव्याप्रमाणे नुकसानभरपाई देते. मात्र, प्रत्येक कंपनी दावा कसा फेटाळता येईल यासाठी अधिक प्रयत्न करत असते, ही वस्तुस्थिती आहे. 

विमा महत्त्वाचाच 
जेव्हा एखाद्याच्या वाहनाला अपघात होतो तेव्हाच वाहनाच्या विम्याची किंमत कळते. कुठलीही दुर्घटना अनपेक्षितपणेच घडते. अशा घटनांना तोंड देण्यासाठी विमा हीच गुरुकिल्ली आहे. जेव्हा वाहन नवीन असते, तेव्हा ते विम्याच्या संरक्षणात असते; पण विमा नूतनीकरण करताना मात्र त्यात निष्काळजीपणा, दुर्लक्षितपणा होऊ शकतो. 
ज्यांच्या वाहनाला अपघात झाला नाही आणि दाव्याची वेळ आली नाही, अशा वेळी विम्याचे पैसे वाया का घालवावे असे कधी वाटू शकते. मात्र, जर वाहनाचा विमा उतरविला नाही तर धोका कायम असतो. वाहनाच्या अपघातानंतर दुरुस्तीचा खर्च प्रचंड मोठा म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या न भरलेल्या हप्त्यांच्या अनेक पटीत तो असू शकतो. जर किमान चार लाखांची कार चोरीला गेली तर तिचा हप्ता हा केवळ पाच ते सहा हजार असू शकतो. त्यामुळे वाहनाचा विमा उतरवणे केव्हाही श्रेयस्करच आहे. 

दावे जातात लाखोंमध्ये 
वाहनाच्या अपघातामध्ये मृत्यू झाला तर अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल होतो. अपघातातील मृत्यूनंतर संबंधितांच्या कुटुंबीयाकडून लाखोंचे दावे दाखल केले जातात. अशा दाव्यात मूळ वाहन मालक जबाबदार असतो; पण विमा असेल तर मालकाच्या वतीने विमा कंपनीवर जबाबदारी असते. मृत व्यक्तीचे उत्पन्न किती होते त्यानुसार त्याच्या निवृत्तीपर्यंतचा हिशेब आणि त्याच्यावरील अवलंबून असलेल्यांचा विचार करून न्यायालयाकडून दावा मंजूर केला जातो. हा दावा पन्नास हजारापासून ते पन्नास लाख किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतो. दावा नसेल तर ही रक्कम मालकाला द्यावी लागते. मग लाखोंचा दावा देण्याची वेळ आलीच तर इतकी मोठी रक्कम कशी देणार, असा प्रश्न निर्माण होतो. 


(संपादन-प्रताप अवचार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT