Badakwasti School's Fruits Washer Machine 
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद शाळेचे पोर हुशार; बनवला भाजीपाला, फळे धुण्याचे यंत्र

सुनील पांढरे

पळशी (जि.औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील दुर्गम भागात असणारी बडकवस्ती जिल्हा परिषद शाळा ही एक प्रयोगशील शाळा म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात ओळखली जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अभिनव प्रयोग साकारलेला आहे. या छोट्या वैज्ञानिकांनी कोरोना काळात भाजीपाला आणि फळे धुण्याचे यंत्र तयार केले आहे. उत्तम आरोग्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आहारात भाजीपाला आणि फळे यांचा समावेश असणे गरजेचे आहे.

मात्र कोरोनाच्या भीतीमुळे पालकांनी फळे आणि भाजीपाला बाजारातून आणणे खूप कमी केले आहे. कारण बऱ्याच लोकांचा फळांना व भाज्यांना स्पर्श होत असतो. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नेमकी हीच बाब विद्यार्थ्यांनी हेरली. मुलांनी त्यांच्या पालकांच्या मनातील भीती घालवून त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळांची व भाज्यांची किती गरज आहे हे पटवून देण्यासाठी व त्यांचा ताण हलका करण्यासाठी हे उपकरण तयार केले. परिसरातच अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून त्यांनी हा प्रयोग आकारास आणला.


मुलांनी तयार केलेल्या यंत्राच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला एकदम स्वच्छ धुतले जाते. त्यानंतर फळांना सुकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगळीच शक्कल लढवली. हेअर ड्रायरच्या मदतीने विद्यार्थ्यांनी फळे आणि भाजीपाला सुकवून पूर्ण निर्जंतुक केला. या यंत्राचा प्रत्यक्ष वापर केल्यानंतर पालकांची सुद्धा मनोवृत्ती बदललेली आहे. बऱ्याच पालकांनी मुलांच्या या कृतीचे कौतुक केले आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मुलांनी जो संदेश दिला तो त्यांच्यापर्यंत कळल्याचे कबूलही केले. मुख्य म्हणजे हा प्रयोग साकारताना विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतली होती. तापमान मोजणे, सॅनिटायझर टायझर आणि मास्कचा वापर आदी बाबींचा पूर्ण वापर केला आहे. अनुजा तांदळे, साईराज कुदळे, चेतन खिल्लारे, आदित्य बडक, दीपक बडक, रूपाली सोनवणे, आशिष सोनवणे, सौरभ राकडे या छोट्या वैज्ञानिकांनी हे उपयुक्त उपकरण तयार केले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक विशाल टिप्रमवार व पाहुणी शिक्षिका प्रिया टिप्रमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी प्रयोगाची जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एस.पी.जैस्वाल व गटशिक्षणाधिकारी दिलीप शिरसाठ, केंद्रीय मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, केंद्रप्रमुख शामराव फुसे, सरपंच दत्ता बडक, अध्यक्ष नारायण बडक , उपाध्यक्ष आबाराव बडक आणि ग्रामस्थांनी स्तूती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रयोग बऱ्याच लोकांपर्यंत पोचला आहे. या माध्यमातून भविष्यातील या छोट्या वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

(संपादन : गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT