Bala Nandgaonkar
Bala Nandgaonkar File photo
छत्रपती संभाजीनगर

दुसऱ्या भोंग्याची गरज नाही, जनताच आमचा भोंगा : बाळा नांदगावकर

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा येत्या १ मे रोजी होणार आहे. औरंगाबाद येथील या सभेसाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सदरील सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार आहे. मात्र दुसरीकडे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी अद्यापही सभेला परवानगी दिलेली नाही. आज बुधवारी (ता.२७) पक्षाचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे औरंगाबादला (Aurangabad) आले आहे. या प्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुसऱ्या भोंग्याची गरज नाही, जनताच आमचा भोंगा आहे. एकच कॅसेट वाजवून काही उपयोग आहे का ? या शब्दांमध्ये नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. (Bala Nandagaonkar Says, We Don't Have Loudspeakers)

मंगळवारी (ता.२६) पवार यांनी आता यांना भोंगा आठवला असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. बाळा नांदगावकर म्हणाले, बाळासाहेब हे बाळासाहेब होते. आमची दिशा, धोरण, नियोजन सर्व राज ठाकरे (Raj Thackeray) हेच आहेत. नुसत हनुमान चालीसा बोलल्याने देशभरात ज्योत प्रज्वलित झाली आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या परवानगीसाठी पोलिस आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगून नांदगावकर म्हणाले, आम्ही पोलिसांना सहकार्य करणार आहोत.

मनसेच्या सभेसाठी पुण्यातून भोंगे आणल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यास पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दुजोरा दिलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT