Bhagwat Karad esakal
छत्रपती संभाजीनगर

महाविकास आघाडी सरकार हे बहिरे आहे, भागवत कराड यांचे टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकार हे बहिरे

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : २०१९ नंतर महाविकास आघाडी सरकार आले.त्यांनी दोन दिवसानंतर येणारं पाणी आठ दिवसांवर केले, अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी राज्य सरकारवर केली. आज सोमवारी (ता.२३) औरंगाबाद (Aurangabad) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. कराड पुढे म्हणाले, माझ्या माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. टँकर कोणाचे ? याचे संशोधन महापालिका प्रशासनाने करावे. १६०० कोटी रुपयांची पाणी योजना केली. या महानगरपालिकेकडे वीजबील भरण्यासाठी पैसे नाहीत. मग पाण्यासाठी पैसे कुठून आणणार ?, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला. (Bhagwat Karad Attacks On Mahavikas Aghadi Government For Water Shortage In Aurangabad)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी जल वाहिनींचे भूमिपूजन केले. पण त्याचे काम पूर्ण झाले नाही. दीड वर्षामध्ये सात टक्केही काम पूर्ण झाले नाही. शिवसेना पाण्याच्या योजनेकडे दुर्लक्ष करित आहे. म्हणून जल आक्रोश मोर्चा आम्ही काढला. महाविकास आघाडी सरकार हे बहिरे झाले आहे. त्यांना ऐकू येत नाही, असा टोला कराड यांनी लगावला.

हे आपलं पहिल आंदोलन आहे. शासन व प्रशासन जागे झाले नाहीतर वारंवार आंदोलने करावे लागेल. या शहरावर तुमचे नेहमी प्रेम असते. ज्या वेळी कचऱ्याचा प्रश्न होता. आपल्या नेतृत्वाखाली पाण्याचा प्रश्न सुटावा, असा आशावाद कराड यांनी या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Winter Weather Forecast : उत्तर भारतातील थंड हवेची लाट पुन्हा वाढली, अजून गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई नाशिक महामार्गावर बाईक अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT