भाजप 
छत्रपती संभाजीनगर

'जनआशीर्वादा'तून भाजप करणार शक्तिप्रदर्शन, बीडला वगळले!

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यातून चार जणांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. हे चारही मंत्री १६ ऑगस्टला त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत. दरम्यान राज्यातील मराठवाडा (Marathwada), कोकण (Kokan), मुंबई (Mumbai) आणि उत्तर महाराष्ट्रातून (North Maharashtra) संधी मिळाल्यामुळे याच भागात केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली १६ ते २१ ऑगस्टदरम्यान 'जनआशीर्वाद' यात्रा (Jan Ashiward Yatra) काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजपतर्फे (BJP) एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी केवळ पाच जिल्ह्यांतच ही जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. यात प्रामुख्याने बीड (Beed), लातूर (Latur), उस्मानाबाद जिल्ह्याला वगळण्यात आल्याने याची सर्वत्र चर्चा (Aurangabad) सुरू झाली आहे. मात्र, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते सत्कार स्वीकारणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी Union Minister Of State For Finance Bhagwat Karad) सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यांचा समवेश झाला.

या मंत्र्यांना खाती वाटप झाल्यानंतर त्यांना मंत्रालयाचे कामकाज आणि संसदेचे अधिवेशन झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे १६ ऑगस्टला हे सर्व मंत्री आपल्या मतदारसंघात परतणार आहेत. दरम्यान, ज्या मतदारांनी निवडून दिले त्यांचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा काढण्यात येईल. मुंबईत केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात येणार आहे. तर मराठवाड्यात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा होईल. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या यात्रेसंदर्भात दिल्लीत नियोजन करण्यात आले.

यासाठी मराठवाड्यातून यात्रा प्रमुख मनोज पांगारकर, सहप्रमुख आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. नंतर स्थानिक पातळीवरही बैठका घेत नियोजन करण्यात आले. मराठवाड्यातील ही यात्रा गोपीनाथ गडावरून सुरू होणार आहे. त्यानंतर ती नांदेड, हिंगोली, परभणी, जालनामार्गे २१ ऑगस्टला औरंगाबादेत दाखल होणार आहे.

यात्रेचे नियोजन भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ठरवले आहे. त्यांच्या आदेशाने प्रत्येक खासदार पाच मतदारसंघात भेटी देणार आहे. १६ ऑगस्टला मी गोपीनाथगडावर येत मुंडे साहेबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन तेथेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पहिला सत्कार स्वीकारणार आहे. त्यानंतर त्यांच्यासोबतही यात्रा पुढे जाणार आहे. पंकजा मुंडे या गंगाखेडपर्यंत राहणार आहेत. यामुळे बीड जिल्ह्याला वगळण्यात आले असे काही नाही.

-डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात १६ ऑगस्टला गोपीनाथगडावरून होईल. ही यात्रा नांदेड, हिंगोली, परभणी, जिंतूर, परतूर, जालना मार्गे औरंगाबादेत दाखल होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील राहिलेल्या भागात ही यात्रा निघेल.

- आमदार अतुल सावे, यात्रा सहप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

IND vs AFG, Viral Video: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकलीच, पण मनंही जिंकली; अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं अन्...

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Marathi News Live Updates : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा बंगल्यावर घेतले गणरायाचे दर्शन

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT