Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

भाजप महापालिका निवडणूक जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करत नेत्यांकडून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुरु

प्रकाश बनकर

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची तारीख अद्यापही स्पष्ट झाली नसली, तरी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. शिवसेनेही शाखानिहाय बैठका घेतल्या. भाजपनेही निवडणुकीत पूर्ण ताकदीने निवडणुकी लढण्याचा निर्धार केला आहे. त्याच दृष्टिकोनातून पक्षातर्फे मंडळनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. यातून निवडणुकीत स्वबळावर लढविण्याचाही नारा प्रत्येक बैठकीतून येत आहेत. महापालिकेत गेल्या अनेक वर्षे भाजप शिवसेनासोबत होते. परंतु राज्यासह येथील राजकीय परिस्थिती आता वेगळी आहे.

हे दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या विरोधात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता शिवसेनेचे मित्र झाले आहेत. तर महापालिका निवडणुकीत भाजपला यंदा स्वबळावर रिंगणात उतरावे लागणार असून तसे संकेतही भाजपने दिले आहे. जो असेल त्याच्यासह आणि जो नसेल त्याच्या शिवाय भाजप महापालिका निवडणूक जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करत नेतेमंडळीकडून कार्यकर्त्यांना बळ देण्याचेही कामही सुरु आहे. मराठवाड्याची राजधानी अशी औरंगाबाद शहराची ओळख असून येथील महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा, त्यादृष्टीने भाजपची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रतिष्ठेच्या या निवडणूकीसाठी यापूर्वीच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रमुख निवडणूक प्रभारी तर आमदार अतुल सावे यांच्याकडे निवडणूक प्रमुख आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, गेले काही दिवस बुथनिहाय बैठका घेण्यात आल्या असून शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आता मंडळनिहाय आढा‌वा घेण्याची जबाबदारी थेट पक्षनेते, प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे.

यात क्रांती चौक मंडळाची जबाबदारी खासदार डॉ. भागवत कराड यांच्याकडे, आमदार अतुल सावे यांच्याकडे गुलमंडी मंडळ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याकडे हडको मंडळ, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर व प्रवीण घुगे यांच्याकडे अनुक्रमे चिकलठाणा व सातारा मंडळ देण्यात आले आहे. यासह प्रदेश पदाधिकारी असलेले मनोज पांगारकर, भगवान घडमोडे, किशोर शितोळे हे अन्य मंडळाचा आढावा घेणार आहेत.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT