20navi_20mumbai_6_1 
छत्रपती संभाजीनगर

ब्रिटनहून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, आतापर्यंत औरंगाबादेत आढळले दोन रुग्ण

मनोज साखरे

औरंगाबाद : ब्रिटन येथून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यापाठोपाठ ब्रिटनहून आलेला आरेफ कॉलनीतील एक २९ वर्षीय तरुणाची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली. या तरुणाची शनिवारी (ता. २६) ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली होती. रविवारी (ता. २७) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली. ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गात अनेकजण आले, त्यामुळे कोरोनाच्या नव्या रुपाने जग धास्तावले. ब्रिटनहून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी अत्यंत चोखपणे केली जात आहे.

शहरातही महापालिका प्रशासनाने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले. शुक्रवारी (ता. २५) ब्रिटनहून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या महिलेला धूत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर आज रविवारी ब्रिटन येथून आलेला २९ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या तरुणाची काल शनिवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली होती. त्याच्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला. या तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.



अजून पाच नागरिकांचा शोध
महापालिका क्षेत्रातील १३ नागरिकांचा शोध लागत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. पोलिस प्रशासन शोध घेणार असल्याचे समजताच १३ पैकी ८ नागरिकांनी कोरोना चाचणी करुन घेतली. परंतु पाच नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT