sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : ‘ती’ चिमुकली गेली होती विसरलेला डबा घेण्यासाठी

रोजाबाग प्रकरण अधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेट

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - महापालिकेच्या रोजाबाग येथील उर्दू शाळेच्या खोलीत पहिल्या वर्गात शिक्षण घेणारी चिमुकली अडकून पडल्याची घटना सोमवारी (ता.२५) घडली होती. या घटनेची प्रशासनाने दखल घेतली असून, उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्या पथकाने शाळेत जाऊन पालक आणि नागरिकांची मते जाणून घेतली. ही मुलगी वर्गात विसरलेला डबा आणण्यासाठी खोलीत गेली होती, असेही चौकशीत समोर आले आहे.

घटनेमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सकाळी शाळेत दाखल झाले. शिक्षिका नर्गीस फातेमा यांच्यासोबत पथकाने चर्चा केली.

उम्मेखैर या चिमुकलीच्या पालकांना बोलावण्यात आले. तिच्या आईने यासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. चिमुकली सर्वांसोबत वर्गाबाहेर पडली. पण तिला जेवणाचा डबा वर्गात असल्याचे लक्षात येताच ती एकटीच आत गेली. तेवढ्या वेळात कुलूप लावण्यात आले, असे यावेळी पथकाला सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई प्रस्तावित केली जाईल. या घटनेतून महापालिकेच्या शाळांनी यापुढे खबरदारी घ्यावी अशी सूचना सर्व शिक्षक, शिपाई आणि वॉचमन यांना देण्यात आल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT