Clean Air:  Sakal
छत्रपती संभाजीनगर

स्वच्छ हवा उपक्रमात महापालिकेची ‘हवा’,राज्यात दुसरा तर देशात पटकावले १२ वे स्थान

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात राज्यात दुसरा नंबर आला आहे. त्यासोबत महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर १२ वे स्थान पटकावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

शहराचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विविध उपक्रम राबविण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात राज्यात दुसरा नंबर आला आहे. त्यासोबत महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर १२ वे स्थान पटकावले आहे.

शहरांचे वाढते प्रदूषण डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा’ उपक्रम सुरू केला असून, त्याअंतर्गत महापालिकांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे. या निधीतून शहरात महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार वाहतूक बेट विकसित करून त्यात कारंजे लावणे, जुन्या कारंज्यांची दुरुस्ती करणे, व्हर्टिकल गार्डन उभारणे, ज्या रस्त्यावर दुभाजक नाहीत, तिथे दुभाजक बांधणे, खुल्या जागा, दुभाजकांमध्ये दाट वृक्षारोपण करणे, शहरातील विविध भागात पडलेले बांधकाम साहित्य उचलणे, फुटपाथ तयार करणे, स्विपिंग मशीनद्वारे रस्त्यावरील धूळ कमी करणे, अशी कामे शहरात करण्यात आली आहेत.

महापालिकांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन व शहरातील हवेची गुणवत्ता तपासून दरवर्षी क्रमवारी जाहीर केली जाते. त्यात हवा देशातील १२६ शहरांमधून छत्रपती संभाजीनगर महापालिकेने १२ वा क्रमांक पटकावला तर राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत प्राण पोर्टलच्या त्रैमासिक अहवालात राज्यातील ठाणे शहर प्रथम तर छत्रपती संभाजीनगर द्वितीय क्रमांकावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या यादीत छत्रपती संभाजीनगरनंतर राज्यातील नवी मुंबई व नागपूर शहरांचा क्रमांक आहे.

दंडात्मक कारवाईमुळे लागली शिस्त

शहरातील अनेक भागात नव्या इमारतींचे कामे सुरू आहेत. जुन्या इमारती पाडताना मोठ्या प्रमाणात धूळ पसरते. त्यामुळे जुने बांधकाम पाडताना व नवे बांधकाम करताना आवेष्टन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम न पाळणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. उपायुक्त रवींद्र जोगदंड, उद्यान अधीक्षक विजय पाटील व स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी सल्लागार गीतांजली कौशिक यांच्या पुढाकाराने ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा’ उपक्रमातील कामे सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-ठाणे मेट्रोसह 'या' ९ मार्गांना सुपरस्पीड मिळणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कनेक्टिव्हिटीचं नवं युग सुरू होणार

Apple on Sanchar Saathi App : ‘अ‍ॅपल’ने सरकारच्या ‘Sanchar Saathi APP’ 'प्रीलोड'बाबत अखेर स्पष्ट केली भूमिका!

Gautam Gambhir : रवी शास्त्री यांनी साधला गौतम गंभीरवर निशाणा; म्हणाले, त्याचा बचाव करणार नाही, कारण १०० टक्के चूक...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरात बोगस मतदार, आमदार चंद्रकांत पाटील यांचा संताप

Voting Machine Failure : अंबड निवडणुकीत मशिन दीड तास बंद; दिव्यांग–वृद्ध ताटकळत; मतदारांमध्ये नाराजी!

SCROLL FOR NEXT