subhash desai.jpg 
छत्रपती संभाजीनगर

नागरिकांनो लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा : पालकमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद :  शहर व वाळूज परिसरात १० ते १८ जुलैदरम्यान जनता कर्फ्यू (लॉकडाऊनची) जिल्हा प्रशासनाने घोषणा केली असून सर्व नागरिकांनी त्याची काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सखोल चर्चा करून १० ते १८ जुलैदरम्यान जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) करण्याची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन दरम्यान, शहर व वाळूज परिसरात संचारबंदी असेल. या काळात सर्व उद्योग, कारखाने, दुकाने, आस्थापना बंद असतील. सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी संलग्न असणारी औषधाची दुकाने यादरम्यान सुरू राहतील.

 नागरिकांना जनता कर्फ्यू (लॉकडाऊनबाबत) चार दिवस आधीच पूर्वकल्पना दिल्यामुळे व बंदचा कालावधी हा केवळ ९ दिवसांचा असल्यामुळे हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करताना श्री. देसाई यांनी केले. नाईलाज म्हणून तसेच रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊनच जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) करण्यात येत आहे असे सांगितले. या लॉकडाऊननंतर पुन्हा अशाप्रकारचा लॉकडाऊन होणार नाही  हा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे .

बंद दरम्यान महापालिकेमार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याद्वारे अधिकाधिक रुग्ण शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाळूज व परिसरात सद्यस्थितीत सुरू असलेले सर्वेक्षण अधिक तीव्र करण्यात येईल, तरी यासाठी सर्वांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT