Samruddhi Mahamarg Accident Esakal
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg Accident: 'समृध्दी'वरील अपघात प्रकरणी CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

'समृध्दी'वरील अपघात प्रकरणी CM शिंदेंचे चौकशीचे आदेश

अंकिता खाणे (Ankita Khane)

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे सत्र सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान बालकांचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेच्या तपास करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरटीओने ट्रक थांबवला आणि त्यानंतर ही बस त्याला मागून धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. या घटनेत जे लोक दोषी असतील. जे आधिकारी दोषी असतील, किंवा ट्रकचा ड्रायव्हर असेल जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं शिंदे म्हणालेत.

तर या घटनेसंदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी संबधित आधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या पकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर आवश्क त्या बाबींची पुतर्ता करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत त्याचबरोबर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. मंत्री दादा भुसे, मंत्री संदीपान भुमरे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून हे प्रवासी पुन्हा नाशिककडे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT