औरंगाबाद - शेंद्र पंचतारांकित एमआयडीसीतील प्रकल्पांची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी. 
छत्रपती संभाजीनगर

जी प्रकल्प जनतेच्या हिताचे,तेथील वाटा थांबवत नाही : उद्धव ठाकरे

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यात जे प्रकल्प जनतेच्या हिताचे जेवढे प्रकल्प आहे, तिथे आम्ही आमचा हिस्सा वाटा देतो. औरंगाबाद-नगर व पुणे-नाशिक या रेल्वेमार्गासाठी आम्ही 50 टक्के हिस्सा देण्यास तयार आहोत. एवढेच नव्हे तर समृद्धीला बुलेट ट्रेन जोडणार असेल तर त्यासाठी सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल व आम्ही पूर्ण मदत करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी (ता.17) औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेंद्रा येथील ऑरिक सिटीला (Auric City) भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी (Aurangabad) संवाद साधला. यावेळी त्यांनी ऑरिकचे व येथील डीएमआयसी सर्व प्रकल्पांची माहिती समजून घेतले. गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की रेल्वेच्या विकासकामाचा 50 टक्केच आहे. सात राज्य सरकारने देणे बंद केले आहेत.

याच विषयी माध्यमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या नाही. आम्ही प्रामाणिकपणे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन होण्याच्या अगोदर नागपूर-मुंबई राजधानी, उपराजधानी ही दोन शहरे जोडली जावेत अशी मागणी केली होती. समृद्धी महामार्गाला बुलेट ट्रेन जोडणार असेल तर त्यास आमचा पूर्ण पाठिंबा राहील व पूर्ण मदत करण्यास आम्ही तयार आहोत. एवढेच नव्हे तर औरंगाबाद-नगर, पुणे-नाशिक या रेल्वेमार्गासाठी 50 टक्के हिस्सा देण्याचे आम्ही जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर जे-जे प्रकल्प जनतेच्या हिताचे आहेत तिथे राज्य सरकार आपला वाटा उचलत असल्याचे सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे तर केंद्रात भाजपचे सर्व एकाच मातीतले आहेत. आपल्या पदाचा अहंकार न ठेवता आपल्या पदाचा राज्यासाठी काय उपयोग करता येईल हे राजकारण बाजूला ठेवून बघितले जावे अशी माझी प्रामाणिक भूमिका असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेंद्र एमआयडीसीची प्रशंसा

शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसी याविषयी ऐकून होतो. मात्र आज पाहण्याचा योग आला. दोन दिवसांपूर्वी नीती आयोगाची बैठक झाली. त्यात उपाध्यक्षांनी ऑरिक सिटीच्या इमारतीचे स्लाईड दाखवली व याची खूप प्रशंसाही केली. त्यामुळे इतर राज्यातील काही गोष्टी घडल्या त्या जाहिरातीत न दाखवता आपल्या राज्यातील चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. त्याची जाहिरात व्हावी असा माझा प्रामाणिक हेतू असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. देशाला आणि राज्याला अभिमान वाटेल अशी ही औद्योगिक वसाहत व सुविधा या एमआयडीसीत उभारण्यात आले आहेत याची जाहिरात व्यवस्थित व्हायला पाहिजे. जेणेकरून राज्यातील उद्योग येथे येतील देशातच नव्हे तर विदेशातही याचा प्रचार प्रसार व्हावा. येथे ज्या सोयी सुविधा आपण देत आहोत याचे मूर्तिमंत उदाहरण आज या ठिकाणी बघायला मिळाले. येथे नवीन उद्योग करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

देशाच्या पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या का असे माध्यमांनी विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की देशाच्या पंतप्रधानांना ट्विटरवरून शुभेच्छा दिले आहेत. मात्र आता शिवसेना शिवसैनिक व माझ्या सर्व पदाधिकारी व इतर सहकाऱ्यांच्या वतीने प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मनापासून देत असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT