Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

कंडोमचा स्टॉक संपलाय : गर्भनिरोधक गोळ्या द्या, खेड्यांत मोठी समस्या

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मुख्यतः शहरातील लोक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या गोळ्या औषधी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. तर दुसरीकडे कंडोम आणि गर्भ निरोधक गोळ्यांचीही विक्रमी विक्री होत आहे. काही भागांमध्ये तर लोकांनी घरी बसावे, म्हणून कंडोमची पाकिटेही वाटण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत. 

या बातम्यांच्या बरोबरीनेच एक आणखी चिंताजनक बातमी पुढे येत आहे. ती म्हणजे, शहरांमध्ये कंडोमची खरेदी वाढल्यामुळे ग्रामीण भागात कंडोमचे शॉर्टेज निर्माण झाले आहे. त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे, कंडोमचा स्टॉक यायला वेळ लागणार असेल; तर तोपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या द्या, अशी मागणी काही ठिकाणी ग्राहकांनी केल्याचं मेडिकल दुकानदारांनी सांगितलं. 

औरंगाबादजवळच्या एका खेड्यात राहणारा तरुण निलेश म्हणाला, की मी कंडोम खरेदी करण्यासाठी मेडिकलमध्ये गेलो होतो. पण त्या ठिकाणी मला हव्या त्या कंडोमचे पाकिट उपलब्ध नव्हते. चौकशी केली असता, नवा माल आलेला नाही, असं मेडिकल दुकानदारानं सांगितलं. पण कंडोम नसेल, तर कसं करणार? माझ्या एका मित्राने तर अडचणीच्या वेळी असाव्यात, म्हणून गर्भनिरोधक गोळ्याही खरेदी करून ठेवल्या आहेत, असंही तो म्हणाला.  

सध्या लॉकडाऊनमुळे मार्केटिंगची मुलेही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कंडोमचा सप्लाय फारतर शहरात केला जाू शकतो. पण दुर्गम ग्रामीण भागांमध्ये सप्लाय करायला अडचणी येत आहेत. काही ठिकाणी बेसिक पॅक उपलब्ध आहेत. पण लोकांना हवे ते फ्लेवर्स पुरेशा प्रमाणात पोहोचवले जाऊ शकत नाहीयेत, एका कंडोम उत्पादक कंपनीचा रिजनल मार्केटिंग मॅनेजर सुशांत यानं सांगितलं.

एकीकडे कुटुंबनियोजनासाठी निरोधचा वापर करणं आवश्यक असल्याचं आवाहन केलं जातं. शासकीय पातळीवरही त्यासाठी प्रयत्न केले जातात, तर दुसरीकडे गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर स्त्रियांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचंही अभ्यासातून पुढे आलं आहे. कंडोमच्या शॉर्टेजमुळे गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढत असेल, तर ही गोष्ट चिंताजनक आहे. पण असं एखाद्या ठिकाणी होऊ शकतं. सगळीकडे पाहिलं, तर चित्र वेगळं असू शकेल, असं शहरातील केमिस्ट श्री. राऊत यांचं म्हणणं आहे. 

प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांची मागणी 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रोटीन आणि व्हिटॅमिन गोळ्या औषधींची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. अनेकी नागरिक मल्टीव्हीटॅमिन औषधी घेण्यासाठी मेडीकल दुकानावर जादा मागणी करीत आहे. तर दुसरीकडे रिकामा वेळ असल्याने विविध माध्यमातून जी माहिती फेसबुक व व्हाॅटसअप वर वैद्यकीय सल्ला म्हणून दिली जाते, तसे करण्याचा प्रयत्न अनेक नागरिक करताना दिसून येत आहेत.

Condom Shortage In Market Customers Demanding Contraceptive Pills

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT