aurangabad news 
छत्रपती संभाजीनगर

महापालिकेत कॉंग्रेसचा स्वबळाचा नारा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- आगामी महापालिकेच्या निवडणुकीत 115 वॉर्डांमधून लढण्याची तयारी करा, जुने हेवेदावे सोडून कामाला लागा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले मंगळवारी (ता. 21) दिले. 

महापालिकेची निवडणूक आगामी एप्रिल महिन्यात होणार आहे. यापार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची गांधी भवनात नुकतीच बैठक पार पडली होती. यावेळी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या शिवसेनेसोबत न जाता स्वबळावर लढण्याची मागणी बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत दोन मतप्रवाह दिसून आले. कॉंग्रेसमधील एका गटाने महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणुकांना आपण समोर गेले पाहिजे असे मत व्यक्त केले तर दुसऱ्या गटाने मात्र स्वबळावर लढण्याची मागणी केली.

पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महापालिकेच्या 115 वॉर्डांमधून लढण्याची तयारी करा असे निर्देश दिले. एका वॉर्डासाठी अकरा जणांची समिती नेमून त्या-त्या वॉर्डातील समस्या, इच्छुक उमेदवारांची नावे, त्याने जनतेची केलेली कामे आदीची माहिती आणि यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील महिन्यात हा सर्व अहवाल कॉंग्रेस प्रदेश कमिटीकडे पाठवावा. त्यानंतर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की महाविकास आघाडी म्हणून यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लवकरच औरंगाबादेत बैठक 
बाळासाहेब थोरात यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आठवडाभरात औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून, यावेळी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. बैठकीला जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे, ज्येष्ठ सदस्य प्रकाश मुगदिया, केशवराव औताडे, रवींद्र काळे, रवींद्र काळे, इब्राहीम पठाण, चंद्रभान पारखे, मोहसीन अहमद, सरोज मसलगे, सुरेखा पानकडे, भाऊसाहेब जगताप यांच्यासह 50 ते 60 पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ChatGPT Down : चॅटजीबीटी पुन्हा ठप्प, जगभरातील लाखो युजर्सचा खोळंबा; OpenAI ने सांगितले कारण

Nimisha Priya : कोण आहेत ग्रँड मुफ्ती? निमिषा प्रियाची फाशी थांबवण्यासाठी केली चर्चा

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Khadakwasla Dam : ‘खडकवासल्या’त सर्वोच्च पाणीसाठा, तेरा वर्षांतील उच्चांकी; धरणक्षेत्रात पावसाचा दिलासादायक परिणाम

Viral Video: रशियन महिलेने प्राणी संग्रहालयात नको ते कृत्य केलं... पाहणारे ही संतापले, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT